काही दिवसांपूर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपला साखरपुडा नुपूर नागर हिच्याशी झाला असल्याचे सांगितले. ही बातमी त्याने सोशल मीडियामार्फत आपल्या चाहात्यांना दिली.
भुवनेश्वरने आत्ताच संपलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर मिळालेल्या सुट्टीत त्याचा साखरपुडा नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत उरकून घेतला. कारण आजपासून परत भारताची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टी २० मालिका सुरु होत आहे आणि भुवनेश्वरची या मालिकेसाठी निवड झाली आहे.
भुवनेश्वरला त्याच्या साखरपुडेनिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट अनेक भारतीय खेळाडूंनी केले आहेत. यातील भारतीय स्फोटक फलंदाज सुरेश रैनाने शुभेच्छा देताना तो भुवनेश्वरच्या लग्नात नाचणार आहे अशा संदर्भाचं ट्विट केलं आहे.
Congratulations @BhuviOfficial looking forward to dance on your wedding 👍😁☑️😝💯 https://t.co/Nuk2iRtPdm
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 5, 2017
या वर्षीच्या आयपीएलमध्ये रैना चांगल्या फॉर्ममध्ये होता परंतु त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. सध्या रैना रणजी सामने खेळत आहे. उत्तर प्रदेश संघाच्या कर्णधारपदी तो आहे. रणजी स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्याची फिटनेस टेस्ट झाली होती त्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी तसेच भारत अ संघासाठीही निवड होऊ शकली नाही.