न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND)यांच्यात टी20 मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव याने नाबाद शतकी खेळी केली. यामुळे भारताने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 191 धावसंख्या उभारली. सूर्यकुमारने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आणि त्याचबरोबर एका अनोख्या विक्रमाची बरोबरी केली.
न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 217.65च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 11 चौकार आणि 7 षटकार खेचले. त्याचबरोबर त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सूर्यकुमारने याच वर्षी इंग्लंडविरुद्ध 117 धावा केल्या होत्या. आता तो न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताना एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी20 शतके करणारा रोहित नंतरचा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
रोहितने 2018 मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी20मध्ये शतके केली होती. आता सूर्यकुमारने या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20च्या डावात भारताकडून 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळताना 100 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी त्याने आतापर्यंत दोनदा केली आहे. Suryakumar Yadav becomes the second Indian batter to score two T20I centuries in a calendar year after Rohit Sharma in 2018
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने चौथ्या विकेटसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या साथीने 41 चेंडूत 82 धावांची भागादारीही केली. त्याने ऑस्ट्रेलियात खेळला गेलेला टी20 विश्वचषकाचा फॉर्म येथेही कायम राखला. त्याने विश्वचषकात 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 6 सामन्यात 239 धावा केल्या होत्या.
TAKE A BOW! 🙌
Suryakumar Yadav brings up his second T20I hundred 💥
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/nfullD65Ww
— ICC (@ICC) November 20, 2022
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यावर्षी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने या हंगामात 2022च्या वर्षात सूर्यकुमारने 30 सामन्यात खेळताना 47.95च्या सरासरीने 1151 धावा केल्या आहेत. त्याने मागील वर्षीच भारताच्या टी20 संघात पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 41 सामने खेळताना 45च्या सरासरीने 1395 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लक्ष कुठे होतं रे? विचित्र पद्धतीने हिट विकेट होताच त्या यादीत सामील झाला श्रेयस
भारताचा ‘सूर्य’ पुन्हा तळपला! टीम इंडियाच्या 6 बाद 191 धावा, कीवी फलंदाज मारणार का मैदान?