भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गड्यांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या डावात एक अशी घटना घडली, जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मजेत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा पकडला. मात्र त्यांनी असे का केले याबाबत संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक महत्त्वाचा खुलासा केलाय.
उमेश यादव हा ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 वे षटक टाकत होता. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हुकला. हा चेंडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने झेलला. त्याने चेंडू बॅटला लागून आपल्या हातात आल्याचे अपील केले. मात्र, पंचांनी हे अपील फेटाळून लावले. त्यावर कार्तिकने कर्णधार रोहित शर्माला तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी गळ घातली. रोहितने काहीसा विचार करत तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलत मॅक्सवेलला बाद ठरवले.
https://twitter.com/SportyVishal/status/1572262984881418240?s=19
इतर कोणालाही याबाबत माहिती नसल्याने एकट्या कार्तिकच्या हट्टामुळे भारतीय संघाला हा बळी मिळाला. त्यामुळे रोहितने आनंदाने कार्तिकला काहीतरी म्हणत त्याचा गळा पकडला. त्यांच्या या ब्रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. तसेच मीम म्हणून देखील याचा वापर होताना दिसतोय.
दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने त्या संपूर्ण घटनेचा खुलासा केला. सूर्या म्हणाला,
“ते दोघे मागील बऱ्याच काळापासून एकत्र खेळत आहेत. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. अशा प्रकारची मजामस्ती त्यांच्यात सुरू असते. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे.”
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जाईल. तर, अखेरचा सामना हैदराबाद येथे होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा