तमिळनाडू प्रीमियर लीग ते इंडियन प्रीमियर लीग त्यानंतर नेट गोलंदाज ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व असा प्रवास करणारा क्रिकेटपटू म्हणजे, ‘टी नटराजन’. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नटराजनने पहिल्याच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत मोठा विक्रम खात्यात नोंदवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथे चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे.
या अटीतटीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. आपल्या घातक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या नटराजनने यादरम्यान ७८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या अर्धशतकाच्या नजीक पोहोचलेल्या मॅथ्यू वेडला त्याने पव्हेलियनला पाठवत पहिली कसोटी विकेट मिळवली. तर त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशेनला देखील बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुडची दांडी उडवत त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा शेवट केला.
यासह भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा तो दुसरा डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंग याच्या नावे या विक्रमाची नोंद होती. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने जानेवारी २००६ मध्ये फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ८९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
यासह आरपी सिंगने १९५२-५२ या हंगामात पाकिस्तानविरुद्ध ९७ धावांवर ३ कसोटी विकेट्स घेणाऱ्या एसएस नयालचंद यांना मागे टाकले होते. आता आरपी सिंगसह नटराजनही नयालचंद यांच्यावर वरचढ चढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-