टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला विश्वचषकात पराभुत केले. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर खूप साऱ्या प्रतिक्रिया पाहायला मिलाल्या. भारताचे माजी दिग्गज खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरनेही ट्वीट करून त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया चाहत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. मात्र, पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट याने सेहवाग आणि गंभीरच्या ट्वीटविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
या दोन्ही माजी भारतीय सलामीवीरांनी ज्याप्रकारचे ट्वीट केले आहे, सलमना बट याला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सेहवाग आणि गंभीरने सामन्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये त्या लोकांवर टीका केली होती, जे पाकिस्तानच्याय विजयानंतर आनंद व्यक्त करत होते आणि आतिषबाजी करत होते. या दोघांनी सामन्यानंतर केलेले हे ट्वीट सलमान बटला मात्र योग्य वाटले नाहीत आणि त्यांनी या दोन दिग्गजांनी केलेल्या ट्वीटविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
सलमानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर याविषयी नाराजी व्यक्त केली. तो यावेळी म्हणाला की, “तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंकडून अशाप्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करत नाहीत. यांनी मोठ्या काळापर्यंत खेळ खेळला आहे आणि खूप मोठे खेळाडू होते. ही अशी लोकं आहेत, ज्यांनी लोकांना समजावलं पाहिजे. जर हेच अशाप्रकारे बोलत असतील, तर लोकांना वाटेल की, हे जे बोलत आहेत, ते योग्य आहे.”
Firecrackers are banned during Diwali but yesterday in parts of India there were firecrackers to celebrate Pakistan ‘s victory. Achha they must have been celebrating victory of cricket. Toh , what’s the harm in fireworks on Diwali. Hypocrisy kyun ,Saara gyaan tab hi yaad aata hai
— Virender Sehwag (@virendersehwag) October 25, 2021
“क्रिकेपटूंनी काही लिहिण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे. कारण त्यांचे खूप फॉलोअर्स असतात. जे हे सांगतात, लोक ती गोष्ट ऐकतात आणि त्याचा परिणामही त्यांच्यावर पडतो. खेळाडूंनी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि सौहार्द आणि एकता वाढवण्यावर लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी योग्य नाहीत, त्याविषयी बोलले नाही पाहिजे,” असेही सलमान पुढे म्हणाले.