टी20 विश्वचषक 2022मध्ये विरोधी संघांना आव्हान देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. अशात या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही प्रतिक्रिया भारतीय सलामीवीर केएल राहुल याच्याशी संबंधित आहे. तो म्हणाला आहे की, टी20 विश्वचषकात राहुल सर्वाधिक यशस्वी ठरेल. आकाश चोप्रा याने असे वक्तव्य का केले, चला जाणून घेऊया…
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या केएल राहुल (KL Rahul) याच्या फलंदाजीशी ताळमेळ बसवणाऱ्या आहेत. त्यामुळे तो भारतासाठी टी20 विश्वचषक 2022मध्ये (T20 World Cup 2022) सर्वाधिक धावा करू शकतो.
‘केएल राहुल करू शकतो भारतासाठी टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा’
आकाश चोप्रानुसार, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर उसळी मिळते. त्यामुळे, हे सर्व केएल राहुलच्या फलंदाजीशी ताळमेळ बसवेल. तो म्हणाला की, “केएल राहुल टी20 विश्वचषकात भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरू शकतो. त्याच्याकडे पूर्ण 20 षटके फलंदाजी करण्याची क्षमता आहे. याशिवाय तो शेवटपर्यंत फलंदाजी करण्यास सक्षम आहे. या प्रकारच्या खेळपट्ट्या त्याला खूप अनुकूल होतील आणि चेंडू बॅटला चांगल्याप्रकारे येईल.”
भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला
भारतीय क्रिकेट संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघ तयारी करत आहे. भारत स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळत आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 168 धावांवर रोखले होते. भारताकडून आर अश्विन (R Ashwin) याने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यासोबतच हर्षल पटेल याने 2 आणि अर्शदीप सिंग याने 1 विकेट घेतली.
भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान केएल राहुल याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 74 धावांची शानदार खेळी साकारली. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापत ‘या’ तिघांची पाठ काय सोडेना, आयपीएल 2022 नंतर आता यावर्षीचा टी-20 विश्वचषकही नाही खेळणार
बेन स्टोक्स! शॉट मारून हिरोगिरी करायला निघालेला ऑलराऊंडर धपकन आपटला, व्हिडिओ पाहाच