पुणे। पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या बेला ताम्हणकर, रिचा चौगुले, ईश्वरी मेहेरे व कोमल नागरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
पुना क्लब टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या सोळाव्या मानांकीत बेला ताम्हणकरने महाराष्ट्राच्याच दुस-या मानांकीत नेहा घारे हीचा 6-3, 4-6, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करत आश्चर्यकारक निकालाची नोंद करत मुख्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत रिचा चौगुलेने आंध्र प्रदेशच्या पवित्रा रेड्डीचा 6-1, 6-4 तर महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत ईश्वरी मेहेरेने दिल्लीच्या बाराव्या मानांकीत अमृता यादवचा 6-0, 6-3 असा दोन सेटमध्ये सहज पराभव करत मुख्य फेरी गाठली.
पुरूष गटात दुस-या पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या प्रणित कुदळेने आपला राज्यबंधु करण लालचंदाणीचा 9-4 असा पराभव करत पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत कुणाल वझीराणीने महाराष्ट्राच्याच गोविंद मोहनचा 9-1 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी:
महिला गट:
बेला ताम्हणकर (महाराष्ट्र)(16) वि.वि नेहा घारे(महाराष्ट्र) (2)6-3, 4-6, 6-0
रिचा चौगुले(महाराष्ट्र)(3) वि.वि पवित्रा रेड्डी(आंध्र प्रदेश)6-1, 6-4
ईश्वरी मेहेरे(महाराष्ट्र)(4) वि.वि अमृता यादव(दिल्ली)(12) 6-0, 6-3
कोमल नागरे (महाराष्ट्र) वि.वि वैदेही काटकार (महाराष्ट्र) 6-1, 6-2
निधित्रा रोजमोहन(तमिळनाडू)(6)वि.वि हृदया शहा(महाराष्ट्र)6-4,7-5
श्रेया तातावर्थी(आंध्र प्रदेश)(10) वि.वि शरण्या शेट्टी(कर्नाटक)(7) 6-0, 6-1
शितल शेट्टी(कर्नाटक)(14) वि.वि प्रगती सोलणकर(महाराष्ट्र)(8) 6-4, 6-4
दुसरी पात्रता फेरी: पुरुष गट:
सुरज प्रबोध(कर्नाटक)(1) वि.वि शाकुंतल पवार(महाराष्ट्र) 9-2
रक्षक ठक्कर(महाराष्ट्र) वि.वि पार्थ ठाकरे (महाराष्ट्र)9-0
अन्वित बेंद्रे (महाराष्ट्र) (11) वि.वि संजय कुमार (महाराष्ट्र) 9-2
अर्पित शर्मा(दिल्ली)(2) वि.वि सारंग वाकपैजण(महाराष्ट्र) 9-2
प्रणित कुदळे(महाराष्ट्र) वि.वि करण लालचंदाणी(महाराष्ट्र) 9-4
हेमंत कुमार(दिल्ली) वि.वि चिन्मय बक्षी(गुजरात) 9-8(5)
कुणाल वझीराणी (महाराष्ट्र)(3) वि.वि गोविंद मोहन(महाराष्ट्र) 9-1