प्रो-कबड्डी लीगमधील तामिल थलायवाजने गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडूमध्ये कबड्डीच्या विकास आणि प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
त्याचाच भाग म्हणून तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग आणि कॉर्पोरेट कबड्डी फेस्टची घोषणा केली आहे.
चिल्ड्रन्स कबड्डी लीगमध्ये तामिळनाडूमधील 8 जिल्ह्यातून 150 शालेय संघाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
तर कॉर्पोरेट कबड्डी फेस्ट चेन्नईच्या अव्हेन्यू एक्सप्रेस मॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. यामध्ये 32 व्यायसायीक कंपन्यांचे संघ सहभागी होणार आहेत.
या कॉर्पोरेट कबड्डी फेस्टसाठी तामिळ थलायवाज स्पर्धेपूर्वी, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देणार आहेत.
यापूर्वी तामिल थलायवाजने भारतातील पहिल्या खाजगी निवासी कबड्डी अकादमीच्या स्थापनेची जूनमध्ये घोषणा केली होती.
ज्यामध्ये तामिळनाडू राज्यातील 80 उद्योन्मुख कबड्डीपटूंना निवड प्रक्रियेद्वारे प्रवेश देऊन त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-खेळाडूंच्या रुममध्ये चांगल्या एसीच्या मागणीवरुन हर्षा भोगले कडाडले!
-यावर्षी लीव्हरपूलच चॅम्पियन्स लीग जिंकणार- हेरडॅन शाकिरी