काल बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्स आणि बांगलादेशचा स्फोटक फलंदाज तमिम इक्बाल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ही घटना ३२ व्या ओव्हरच्या चौथ्या बॉल वर झाली जेव्हा तमिमने स्ट्रोक्सला चौकार खेचला.
आपल्याला चौकार मारल्यामुळे स्ट्रोक्स विशेष वैतागला आणि त्याने तमिमच्या खांद्यावर कुत्सितपणे शाबासकी दिली. त्यामुळे वैतागलेल्या तमीमने आपला राग व्यक्त केला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. दोंन्ही पंचांनी मध्ये येऊन भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला.
३२व षटक संपल्यावर त्यांच्यात पुन्हा वादावादी सुरु झाली परंतु यावेळी त्यांच्याबरोबर प्रेक्षकही सामील झाले. मोठ्या प्रमाणावर आलेल्या बांग्लादेशी प्रेक्षकांनी यावेळी तमिम इक्बालला पाठिंबा देत स्ट्रोक्सची थट्टा केली. जेव्हा स्टोक्स सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी गेला तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्याला प्रेक्षकांनी चिडवले.
या घटनेने तमिम इक्बालचे लक्ष अजिबात विचलित झाले नाही आणि ३९व्या षटकात त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मधील पहिले शतक नावावर लावले. याबरोबर तो फक्त दुसरा बांगलादेशचा खेळाडू ठरला ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक केले.
पहा बेन स्ट्रोक्स आणि तमिम इक्बाल यांच्यातील शाब्दिक चकमक
https://twitter.com/lKR1088/status/870247484395630592?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fsportzwiki.com%2Fcricket%2F2017-icc-champions-trophy-2017-video-tamim-iqbal-ben-stokes-involved-exchange-words-crowd-jeers-stokes%2F