दुबई येथे होणाऱ्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी अर्जेन्टिना संघाची घोषणा करण्यात आली आहे. २२ जून ते ३० जून दरम्यान पार पडणाऱ्या कबड्डी मास्टर्स यास्पर्धेत ६ देशांचा समावेश आहे.
यामध्ये बलाढ्य भारतीय संघ त्याचंबरोबर पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया हे आशियातील संघ सहभागी होत आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचा प्रसार होण्यासाठी केनिया व अर्जेन्टिना या संघाचाही यास्पर्धेत समावेश केला आहे.
भारतात झालेल्या कबड्डी विश्वचषक २०१६ मध्ये केनिया आणि अर्जेन्टिना संघाचा सहभाग होता. कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी अर्जेन्टिना कबड्डी असोसिएशन कडून अर्जेन्टिना संघाची घोषणा करण्यात आली आहे.
अर्जेन्टिना कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष आणि अर्जेन्टिना संघाचे कोच रिकार्डो अकुना यावेळी म्हणाले”अर्जेन्टिना हा प्रामुख्याने फुटबॉल प्रेमी देश आहे. त्यामुळे नवीन खेळांना प्रोत्साहन देऊन क्रीडाक्षेत्राला नवीन आयाम देण्याचा हा एक प्रयत्न आहे. कबड्डी खेळ अर्जेन्टिना पर्यत पोहचणे हे एकंदरीतच क्रीडाक्षेत्रासाठी लक्षणीय आहे,या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा सर्व जगासमोर मांडण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळत आहे. त्यामुळे या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
अर्जेन्टिना संघ पुढीलप्रमाणे:
१) फेडरिको ग्रामजो २) राफाईल असेवडो ३) गाब्रिरील सच्ची ४) मारीआनो पासकल ५) जॉर्ज बरझा ६) सेबीएस्टीआन डेसेसीओ ७) रोमन सेसारो ८) नाहूएल लोपेज ९)जविअर कॅमेरा १०) इव्हान मोलीना ११) फ्रॅंको कास्टो १२) मार्टिआझ मारटीनेझ १३) सेबीस्टीआन कॅनसिया १४)नाहूएल विल्लामायोर
अर्जेन्टिनाचे सामने:
१) अर्जेन्टिना विरुद्ध इराण (२३ जुन)
२) अर्जेन्टिना विरुद्ध कोरिया (२४ जुन)
३) अर्जेन्टिना विरुद्ध इराण (२६ जुन)
४) अर्जेन्टिना विरुद्ध कोरिया (२७ जुन)
महत्त्वाच्या बातम्या-
–कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
–संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने