भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा असून तो 30 एप्रिल 2024 रोजी 37 वर्षांचा होईल. वयाच्या या टप्प्यावरही रोहित कर्णधार आणि फलंदाज म्हणून चमकतोय, यात शंका नाही. मात्र आता त्यानं पहिल्यांदाच क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार यावर आपली प्रतिक्रिया दिली. रोहितनं तो क्रिकेटला कधी अलविदा करणार हे सांगितलं आहे. धरमशाला कसोटीत इंग्लंडवर डाव आणि 64 धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर रोहितनं निवृत्तीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिओ सिनेमावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा एक दिवस मला जाग येईल आणि वाटेल की मी आता खेळण्यासाठी फिट नाही, तेव्हा मी क्रिकेटपासून दूर जाईन आणि लगेचच निवृत्ती घेईन. मात्र मी गेल्या 2-3 वर्षांपासून माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्रिकेट खेळतोय.” रोहितच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय की सध्या तरी त्याचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली. भारतानं 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील बलाढ्य इंग्लंड संघाचा 4-1 असा पराभव केला. या संपूर्ण मालिकेत रोहितची कर्णधार म्हणून कामगिरी उत्कृष्ट राहिली. एक फलंदाज म्हणून त्यानं 5 सामन्यात 400 धावा केल्या, ज्यात 2 शतकांचाही समावेश आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही खूप आनंदी दिसला. त्यानं रोहित शर्माचं भरभरून कौतुक केलंय. तो म्हणाला की, मालिका विजयाचं श्रेय पूर्णपणे रोहितला जातं, ज्यानं पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रूमचं वातावरण शांत ठेवलं.
द्रविड पुढे म्हणाला की, “रोहितची फलंदाजी पाहणं आनंददायी आहे. मी त्याला मधल्या फळीपासून सलामीपर्यंत फलंदाजी करताना पाहिलंय. त्याचा हा प्रवास खूपच अप्रतिम होता. या कसोटी मालिकेत राजकोटमध्ये 3 विकेट्स पडल्यानंतर त्यानं ज्या प्रकारची शतकी खेळी खेळली ती आश्चर्यकारक होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
Video : ग्लेन फिलिप्सचा हा झेल पाहून क्रिकेटविश्व हैराण! तुम्हीही एकदा पाहाच
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त