भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मंगळवारी ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर – गावसकर मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व देशभरातून संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच कोच रवी शास्त्री यांनीदेखील सामना संपल्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये खेळाडूंचे कौतुक केले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रवी शास्त्री म्हणाले ,” माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. तुम्ही सर्वांनी जो संघर्ष दाखवला तो खरोखरच अविश्वसनीय आहे. तुम्ही एकदासुद्धा हार मानली नाही. दुखापती असो अथवा 36 वर बाद होणे असो, अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. हे सर्व काही एका रात्रीत होत नाही. यात बऱ्याच वर्षांची मेहनत असते. तुम्हा सर्वांना लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा एक संघ म्हणून तुम्ही उत्तम कामगिरी करतात.”
रवी शास्त्री संघातील खेळाडूंबद्दल बोलतांना म्हणाले, “शुभमनची खेळी शानदार होती. पुजारा एक अल्टिमेट वॉरियर आहे. रिषभने अविश्वसनीय फलंदाजी केली. रिषभ फलंदाजी करताना इतरांना हार्टअटॅक देऊ शकतो.पण त्याची खेळी अप्रतिम होती. अजिंक्य तू कर्णधार म्हणून ज्या परिस्थितीतून संघाला सावरले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन व शार्दुल ठाकुरला देखील विसरून चालणार नाही. त्यांनी देखील उत्तम कामगिरी केली.”
रवी शास्त्री यांनी संपूर्ण संघाला या विजयाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री म्हणाले, “आज भारत व संपूर्ण जग तुम्हाला सॅल्यूट करत आहे. तुम्ही आज जे काही केल आहे, त्याचा मजा घ्या. जितका आनंद लुटता येईल, तितका आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सर्व युवा खेळाडूंनी व सपोर्ट स्टाफने उत्तम कामगिरी केली आहे. सुरुवात मेलबर्न येथे झाली, सिडनी सामना शानदार होता व गाबा येथे आल्यावर मालिका बरोबरीत होती. तुम्ही केलेली आजची कामगिरी केली आहे ती खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे.”
WATCH – Exclusive: Head Coach @RaviShastriOfc delivers a dressing room speech at Gabba.
A special series win in Australia calls for a special speech from the Head Coach. Do not miss!
Full 📽️📽️https://t.co/kSk2mbp309 #TeamIndia pic.twitter.com/Ga5AaMvkim
— BCCI (@BCCI) January 19, 2021
भारताने २-१ ने जिंकली मालिका-
या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. भारताने ऍडलेड येथे झालेला पहिला सामना ८ विकेट्सने गमावला होता. मात्र यानंतर भारताने यशस्वी पुनरागमन केले आणि मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना ८ विकेट्सने जिंकला. यानंतर सिडनी येथे झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्रिस्बेनचा सामना निर्णायक कसोटी सामना ठरणार होता. या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेवर २-१ने कब्जा केला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय संघातील हिरे! जाणून घ्या या ५ खेळाडूंची संघर्षगाथा
वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक
आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने