नेदरलँड क्रिकेट संघासाठी गुरुवार (6 जुलै) ऐतिहासिक ठरला. वनडे विश्वचषक 2023 साठीच्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये गुरुवारी नेदरलँडने स्कॉटलँडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँडसाठी बास डी लीड याने जबरदस्त प्रदर्शन करून नेदरलँडला विश्वचषकात स्थान मिळवून दिले. त्यामुळे आता 8 वर्षानंतर नेदरलँड संघ पुन्हा एकदा वनडे विश्वचषकात खेळताना दिसेल. नेदरलँड संघाने विश्वचषकासाठी पात्र ठरतात विश्वचषकातील दहा ही संघ निश्चित झाले. त्यामुळे आता भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे.
नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड या सामन्यात विजय मिळवणारा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार होता. यामध्ये नेदरलँडने आपल्या शेजारी देशाला पराभूत करत विश्वचषकात खेळण्याचा मान मिळवला. मागील वेळी विश्वचषकात खेळण्याची संधी हुकल्यानंतर त्यांनी यावेळी झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज या आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या संघांना पराभूत करत इथपर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली आहे.
नेदरलँडच्या विजयानंतर आता विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक तयार झाले असून, भारतीय संघ कोठे खेळणार हे देखील निश्चित झाले.
भारत वि. ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, ठिकाण– चेन्नई
भारत वि. अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, ठिकाण– दिल्ली
भारत वि. पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, ठिकाण– अहमदाबाद
भारत वि. बांगलादेश, 19 ऑक्टोबर, ठिकाण- पुणे
भारत वि. न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, ठिकाण– धर्मशाला
भारत वि. इंग्लंड, 29 ऑक्टोबर, ठिकाण– लखनऊ
भारत वि. श्रीलंका, 2 नोव्हेंबर, ठिकाण– मुंबई
भारत वि. द. आफ्रिका, 5 नोव्हेंबर, ठिकाण– कोलकाता
भारत वि. नेदरलँड्स, 11 नोव्हेंबर, ठिकाण– बंगळुरु
(Team India Full Schedule Of 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
आशिया कप-वर्ल्डकपआधीच रंगणार भारत-पाकिस्तानची रंगीत तालीम! या दिवशी रंगणार द्वंद्व
अफलातून! संघाने विश्वचषकात एन्ट्री करण्याची संधी गमावली, पण पठ्ठ्याने 23व्या वर्षी शतक ठोकत घडवला इतिहास