भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर करत वर्चस्व गाजवले. भारताने 3-0 ने बांगलादेशला क्लीन स्वीप केले. भारताने बांगलादेशवर मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) प्रतिक्रिया समोर आली आहे.
बांगलादेशवर भारताच्या ऐतिहासिक 3-0 मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला आणखी एक विजय मिळाला.”
A tour de force! 🇮🇳 pic.twitter.com/fzhpEaHxTN
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 12, 2024
श्रीलंका दौऱ्यावर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पहिल्यांदाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी भारतीय संघाने टी20 मालिकेत 3-0 ने मोठा विजय मिळवला होता, तर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-0 ने निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. टी20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सलग दुसरी मालिका जिंकली आहे. याआधी भारताने बांगलादेशचा कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला होता.
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने बांगलादेशला तिन्ही सामन्यात डोकं वर काढू दिलं नाही. बांगलादेशचा भारत दौरा खूपच खराब राहिला. 2 सामन्यांच्या झालेल्या कसोटी मालिकेतही बांगलादेशला एकही विजय मिळवला आला नाही, तर 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतही बांगलादेश संघ विजयापासून वंचित राहिला.
महत्त्त्वाच्या बातम्या-
बाबरची तुलना कोहलीशी करणं माजी खेळाडूला पडलं महागात! चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल
IND vs NZ; कसोटी मालिकेत किवी फलंदाजाने घातला होता धुमाकूळ! 68 वर्षापासून रेकाॅर्ड कायम
24 वर्षीय फिरकीपटूनं रचला इतिहास! बुमराह-कुलदीप-हार्दिक सर्वांना टाकलं मागे