यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम (ट्रेंट ब्रिज) येथील पहिला सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाला अखेरच्या दिवशी विजयाची संधी असताना पावसामुळे एकही चेंडू न टाकला गेल्याने सामना अनिर्णित करावा लागला. त्यानंतर, आता लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाच्या सराव सत्राची छायाचित्रे नुकतेच समोर आली असून, कर्णधार विराट कोहलीने सरावात ही पुढाकार घेतलेला दिसतोय.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ तयार
नॉटिंघम कसोटी अनिर्णित राहिल्याने भारतीय संघाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी हुकली. भारताला अखेरच्या दिवशी केवळ १५८ धावांची गरज होती व संघाचे नऊ गडी शिल्लक होते. मात्र, अखेरच्या दिवशी पाऊस व खराब वातावरणामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना
१२ ऑगस्टपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघाने मंगळवारपासून (१० ऑगस्ट) तयारी सुरू केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ट्विटर हँडलवरून भारतीय संघाच्या पहिल्या सत्राची छायाचित्रे शेअर केली आहेत.
ज्यामध्ये संपूर्ण भारतीय संघ तसेच, कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा व प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सराव करताना दिसतायेत. या ट्विटला ‘लॉर्ड्ससाठी तयारी’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. भारतीय संघ २०१४ नंतर प्रथमच लॉर्ड्सवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. २०१८ दौऱ्यावेळी संघाला डावाने पराभव स्वीकारावा लागला होता.
Getting Lord's ready 💪#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/cy0x5K122y
— BCCI (@BCCI) August 10, 2021
— BCCI (@BCCI) August 10, 2021
लॉर्ड्स कसोटीसाठी संभावित भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
जसप्रीत बुमराहचे ‘ते’ गूढ ट्विट होतेय व्हायरल
बार्मी आर्मीने केला खोडसाळपणा! ‘त्या’ छायाचित्रामुळे उठले वादळ, विराटला केले टार्गेट
विराटचा सुकाळ संपला आहे का? चाहत्यांना सतावतोय प्रश्न