पुणे । स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, सेल २ वर्ल्ड, अॅमडॉक्स, कॅलसॉफ्ट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सेल्वा नारायणच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर टेक महिंद्रा संघाने इन्फोव्हिजन लॅब्स संघाचा 84 धावांनी दणदणीत पराभव करत उद्धाटनाचा दिवस गाजवला.
पहिल्यांदा खेळताना स्वप्निल थोरातच्या 47 धावांच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने 9 षटकात 3 बाद 106 धावा केल्या. 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सेल्वा नारायण व तन्विर शेख यांच्या अचूक गोलंदाजीपुढे इन्फोव्हिजन लॅब्स संघ चार चेंडू बाकी असताना सर्वबाद 22 धावांत गारद झाला. सेल्वा नारायण सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत प्रतिक दुबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सेल २ वर्ल्ड संघाने बार्कलेज संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना बार्कलेज संघाने 9 षटकात 5 बाद 34 धावा केल्या.
34 धावांचे लक्ष अक्षय भोसलेच्या 14 तर प्रतिक दुबेच्या नाबाद 16 धावांच्या बळावर सेल २ वर्ल्ड संघाने 5.2 षटकात 2 बाद 35 धावांसह सहज पुर्ण करत विजय मिळवला. प्रतिक दुबे सामनावीर ठरला.
तिस-या लढतीत भावनीश कोहलीच्या अफलातू फलंदाजीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने नॉर-ब्रेम्से संघाचा 140 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा अॅमडॉक्स संघाने 9 षटकात 3 बाद 169 धावा केल्या.
यात भावनीश कोहलीने केवळ 39 चेंडबत अफलातून फटकेबाजी करत 138 केल्या. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर-ब्रेम्से संघाचा डाव केवळ 8.3 षटकात सर्वबाद 29 धावांत गारद झाला.
निशांत रुकमंगद, सत्येंद्र यादव व हितेश थंडानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. भावनीश कोहली सामनावीर ठरला.
अन्य लढतीत निलेश साळुंखेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कॅलसॉफ्ट संघाने आयप्लेस संघाचा 55 धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टेक महिंद्रा- 9 षटकात 3 बाद 106 धावा(स्वप्निल थोरात 47, गुरप्रीत सिंग 23, श्रीकांत मेत्रे 22, मंदार कुलकर्णी 2-18) वि.वि इन्फोव्हिजन लॅब्स- 8.2 षटकात सर्वबाद 22 धावा(राकेश अगरवाल 20, सेल्वा नारायण 4-3, तन्विर शेख 2-7) सामनावीर- सेल्वा नारायण
टेक महिंद्रा संघाने 84 धावांनी सामना जिंकला.
बार्कलेज- 9 षटकात 5 बाद 34 धावा(संदिप कानिटकर 26, प्रतिक दुबे 2-5) पराभूत वि सेल २ वर्ल्ड- 5.2 षटकात 2 बाद 35 धावा(अक्षय भोसले 14, प्रतिक दुबे नाबाद 16, आकाश थिटे 2-11) सामनावीर- प्रतिक दुबे
सेल २ वर्ल्ड संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
अॅमडॉक्स- 9 षटकात 3 बाद 169 धावा(भावनीश कोहली 138(39), सुमित देसवाल 14, सिध्दार्थ वैद्य 2-54) वि.वि नॉर-ब्रेम्से- 8.3 षटकात सर्वबाद 29 धावा(सिध्दार्थ वैद्य नाबाद 24, मयुर घुले 14, निशांत रुकमंगद 2-10, सत्येंद्र यादव 2-10, हितेश थंडानी 2-30) सामनावीर- भावनीश कोहली
अॅमडॉक्स संघाने 140 धावांनी सामना जिंकला.
कॅलसॉफ्ट- 9 षटकात 2 बाद 102 धावा(अक्षय पिदाडी नाबाद 15, स्वप्निल पंडित नाबाद 40, शंतनू मराठे 2-40) वि.वि आयप्लेस- 9 षटकात 7 बाद 47 धावा(जेफ्री डिसुझा 19, तुषार तनपुरे 33, मंगेश अहिरे 11, निलेश साळुंखे 4-26) सामनावीर- निलेश साळुंखे
कॅलसॉफ्ट संघाने 55 धावांनी सामना जिंकला.