प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमामध्ये खेळाचे जेमतेम १६-१७ दिवस उलटले आहेत. या १६-१७ दिवसात या मोसमात चार सामने बरोबरीत सुटले आहे. सुरुवातीच्या या काळात इतके सामने बरोबरीत सुटण्याची प्रो कबड्डीमधील ही पहिलीच वेळ.
पहिल्या मोसमामध्ये सर्वाधिक ६ सामने बरोबरीत सुटले होते. प्रो कबड्डीमधील पहिला बरोबरीत सुटलेला सामना होता २८ जुलै २०१४ साली यु.मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांच्यामध्ये. या मोसमात तेलुगू टायटन्स आणि यु मुंबा या दोन संघाचा प्रत्येकी तीन बरोबरीत सुटलेल्या सामन्यात सहभाग होता. बरोबरीत सुटलेल्या दोन सामन्यात पटणा संघाचा सहभाग होता. पहिल्या मोसमात फक्त दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण या संघाचे सामने बरोबरीत सुटले नाहीत.
दुसऱ्या मोसमात चार सामने बरोबरीत सुटले होते. या चार सामन्यापैकी तीन सामन्यात एक संघ हा तेलगू टायटन्स होता.या मोसमातील पहिला बरोबरीत सुटलेला सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध पटणा पायरेट्स यांचा झाला होता. तेलुगू टायटन्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स ,तेलुगू टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण, तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली या तीन सामने तेलुगू टायटन्स चे बरोबरीत सुटले होते.
तिसऱ्या मोसमात फक्त एक सामना बरोबरीत सुटला होता. पुणेरी पलटण विरुद्ध पटणा पायरेट्स हा एकमेव सामना बरोबरीत सुटला होता. चौथ्या मोसमात चार सामने बरोबरीत सुटले होते. चोथा सामना यु मुंबा विरुद्ध तेलुगू टायटन्स. हा सामना बरोबरीत सुटला होता.
आजपर्यंत पाचव्या मोसमात चार सामने बरोबरीत सुटले आहे. यात देखील तेलुगू टायटन्सचा एक सामना बरोबरीत सुटला आहे. पहिल्या मोसमात तीन ,दुसऱ्या मोसमात तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. चौथ्या आणि पाचव्या मोसमात प्रत्येकी एक सामना बरोबरीत सुटला आहे. तेलुगू टायटन्सचे एकूण ८ सामने बरोबरीत सुटले आहेत. प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सामने बरोबरीत सोडवण्याचा हा वेगळाच विक्रम तेलगू टायटन्सच्या नावावर आहे.