ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये एक चॅरिटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना वॉर्न एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश संघात खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी वॉर्न एकादश संघाचा कर्णधार महान गोलंदाज शेन वॉर्न असेल तर पाँटिंग एकादशचा कर्णधार रिकी पाँटिंग असणार आहे.
विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक असणार आहे. तर वेस्ट इंडिजचे अनुभवी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.
याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले, ‘आम्हाला सचिन तेंडूलकर आणि कर्टनी वॉल्श यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. आम्ही खास दिवसासाठी त्याची वाट पाहत आहोत. दोन्ही खेळाडू त्यांच्याकाळातील दिग्गज होते.’
तसेच पाँटिंगनेही सचिनबद्दल ट्विट केले आहे. पाँटिंगने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘सचिनला बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये भाग घेताना पाहून आणि एका चांगल्या कारणासाठी तो त्याचा वेळ देत आहे, हे पाहून चांगले वाटत आहे. चांगल्या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तो योग्य आहे.’
How great is it to have @sachin_rt taking part in the Bushfire Cricket Bash and giving up his time to come out for the cause. Picked the right team to coach too! pic.twitter.com/RVSdy28vO7
— Ricky Ponting AO (@RickyPonting) January 21, 2020
हा चॅरिटी सामना 8 फेब्रुवारीला बीग बॅश लीग 2019-20 च्या अंतिम सामन्याआधी खेळवला जाईल. या चॅरिटी सामन्यात पाँटिंग, वॉर्न यांच्यासह ब्रेट ली, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन, मायकल क्लार्क, जस्टिन लँगर, ऍलेक्स ब्लॅकवेल असे दिग्गज खेळाडूही खेळताना दिसणार आहेत.
तसेच या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी कर्णधार स्टिव्ह वॉ आणि मेल जोन्स नॉन प्लेइंग स्टाफचा भाग असतील. या सामन्यात होणारी सर्व कमाई ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस डिझॅस्टर रिलिफ अँड रिकव्हरी फंडला दिली जाईल.
मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वनडे संघात; धवनऐवजी टी२०साठी या खेळाडूची झाली निवड
वाचा👉https://t.co/IazJY0aMsS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने शेअर केला खास फोटो, एक तासातच आल्या १ लाख लाईक्स
वाचा- 👉https://t.co/nnH6LUL68f👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020