क्रिडा मैदानावर कडी सुरक्षा व्यवस्था असतानाही बऱ्यादचा दुर्घटना घडल्याचे दिसून येते. कधी-कधी अचानक अशा दुर्घटना घडतात, तर कधी खेळाडू जल्लोषाच्या भरात असे काही करून जातात, ज्यामुळे मोठे संकट निर्माण होते. असेच काहीसे एका बास्केटबॉल सामन्यादरम्यान पाहायला मिळाले.
झाले असे की, बास्केटबॉलचा सामना चालू होता. दोन्ही संघाचे खेळाडू सामन्यावर लक्ष केंद्रित करून जोमाने खेळत होते. अशात एका संघाच्या खेळाडूंनी गोल २ गुणांची कमाई करण्याच्या हेतूने बॉल हिट केला. डिफेंसमध्ये विरोधी संघाचा एक खेळाडू बॉलला अडवायला गेला. उत्साहाच्या भरात त्याने डोक्याच्या वर काही अंतरावर असलेली शिडी दोन्ही हातांनी पकडली आणि काही वेळ तसाच शिडीला लटकत राहिला.
त्या खेळाडूच्या वजनाने शिडीचा वरील पकड सुटला अन् जोराने ती शिडी मैदानावर कोसळली. हे पाहून, सर्व खेळाडूंनी आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने मैदानाबाहेर धाव घेतली. सुदैवाने या खतरनाक घटनेवेळी कुणाला दुखापत झाली नाही. सोशल मीडियावर या दुर्घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
This gotta be the craziest thing I’ve ever seen happen on a basketball court 😳 pic.twitter.com/MUgA17z2ug
— B/R Hoops (@brhoops) January 23, 2021
Great that nobody got injured
— Unfollow (@atharva_8304) January 23, 2021
— Norby Williamson (@MarkPopesBurner) January 23, 2021
Send it in Jerome! pic.twitter.com/XX0ZC1CIHC
— Chris Hedden (@Hedden4Hawks) January 23, 2021
Final Destination vibes 😭 pic.twitter.com/FR0TM63Pgc
— Mamba West ⚽️🐍 (@king23solomon) January 23, 2021
With Jerry Lawler and Vince McMahon commentary. 😬 @JerryLawler @VinceMcMahon pic.twitter.com/s5EBTyQ88M
— Chad (@ChadBlue83) January 23, 2021
Don’t hang on the damned rim like a clown! Somebody could have been killed!!!
— Tony Drane (@tonydrane) January 23, 2021
बऱ्याच नेटकरींनी हा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पाहून हैरानी व्यक्त केली आहे. काहींनी कुणालाही दुखापत न झाल्याने, आनंद व्यक्त केला आहे. तर काहींना अशाप्रकारे कोणत्याही वस्तूला लटकू नये, या अपघातात कुणालाचा जीव गेला असता, अशी प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू
“विराटला नेतृत्त्वपदावरुन हटवाल, तर टीम इंडियाची परंपरा धुळीस मिळेल”, दिग्गजाचे मोठे भाष्य
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी युवीसोबत ‘हा’ सराव केल्याने झाला फायदा”, शुबमन गिलने केला खुलासा