भारतीय संघाला विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर शुक्रवारपासून कसोटी सामना खेळायचा आहे. इंग्लंड संघ सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी सुरू होत आहे. त्याआधी पहिल्या सामन्यात भारताने 28 धावांनी पराभव स्वीकारला आहे. पण विशाखापट्टणमचे मैदानात भारतीय संघासाठी खास ठरले आहे. असात दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ कडवे आव्हान देईल.
विशाखापट्टणममध्ये भारतीय संघाचे आकडे चांगले राहिले आहेत. अशात दुसऱ्या कसोटीत संघ विजय मिळवू शकतो. वायझॅक स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 2 कसोटी सामने खेळले गेले आहेत. 2016 साली भारत विरुद्ध इंग्लंड, तर 2019 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेच ते दोन सामने होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने मोठ्या अंतराने विजय मिळवले होते.
2016 मध्ये भारताने इंग्लंड संघाला वायझॅक स्टेडियमवर 246 धावांनी पराभूत केले होते. तसेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 2019 मध्ये भारताने 2015 धावांनी विजय मिळवला होता. याठिकाणी खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात मयंग अगरवाल याने पहिल्या डावात द्विशतक ठोकले होते. तर रोहित शर्माने दोन्ही डावांमध्ये मिलून 300 धावा कुटल्या होत्या. सामन्यातील पहिल्या डावात 173, तर दुसऱ्या डावात त्याने 127 धावा कुटल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा –
अशात भारतीय संघाने वायझॅकवर आपल्या शेवटच्या सामन्यासारखे प्रदर्शन केले, तर संघ याठिकाणी सलग तिसरा कसोटी सामनाही जिंकू शकतो. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील हा भारताचा पहिलाच विजय असेल. वायझॅकच्या खेलपट्टीवर तिसऱ्या दिवसानंतर धावा करणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेताना दिसू शकतो. (Test records of the Indian team in Visakhapatnam)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । अश्विन पार करणार तीन मैलाचे दगड, ठरणार ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय
भारतीय खेळपट्टीवर शोएब बशीर करणार पदार्पण, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचे बदल