थायलंड। 14 जूनपासून फुटबॉल विश्वचषक ‘फिफा’ला सुरूवात होत आहे. 2018चा हा रशियात सुरू होणारा 21वा फिफा विश्वचषक आहे.
खेळ सुरू झाले की त्याच्यावर बेटींग करणे हे आलेच. ही एक सामान्य गोष्ट आहे पण तो एक गुन्हाही आहे.
अशाच गुन्ह्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी थायलंडमधील संस्थेने एक नामी शक्कल लढवली आहे.
2018च्या फिफा विश्वचषकातील जुगार विरोधी मोहिमेसाठी थायलंडमधील हत्तींनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी नऊ हत्तींच्या अंगावर या विश्वचषकात सहभाग घेणाऱ्या संघांचे झेंडे रंगवण्यात आले. त्यानंतर ते हत्ती 15 मिनीटे तेथील शाळेतील मुलांसोबत फुटबॉल खेळले.
आयोजकांना या विद्यार्थ्यांना हे सांगायचे आहे की,”हा विश्वचषक चांगला खेळ पाहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी असून तो बेटिंग करण्यासाठी नाही.”
“खेळ हा जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आणि नवे रंग भरण्यासाठी असतात. तर ते खेळ आपण जुगार न खेळता आनंद बघून फुटबॉलपटूंना चीयर करावे”,असे अयुथाया एलिफंट पॅलेस आणि रॉयल क्रालचे उपमुख्य अधिकारी रेआंगथोंगबहट मेफेन म्हणाले.
थायलंड आणि मलेशिया मध्ये फुटबॉल खेळ खूप प्रसिद्ध असल्याने तेथे जास्त प्रमाणात बेकायदेशीर जुगार खेळला जातो. तर काही जणांचे हे कामच बनले आहे.
बेटिंग करणे किंवा जुगाराचा प्रसार करणे थायलंडमध्ये फौजदारी गुन्हा मानला जातो. जर कोणी हा गुन्हा केला तर त्याला 1000 बाहट म्हणजेच 31.17 युएस डॉलरचा दंड होतो.
जर हा गुन्हा लहान मुलांनी केला तर त्यांच्या पालकांना 10,000 बाहट म्हणजेच 311.72 युएस डॉलरचा दंड किंवा 3 महिन्यांची कैद होते.
थाई विद्यापीठानुसार, यावर्षी थायलंडमध्ये विश्वचषकासाठी 59 बिलीयन बाहट (1.84 युएस बिलीयन डॉलर) एवढी प्रचंड बेटींग झाली आहे. त्यामुळे थायलंडच्या अर्थव्यवस्थेत 0.2 टक्क्यांनी आर्थिक वाढ झाली आहे.
फुटबॉलवर बेटिंग करणे थायलंडमध्ये फार सोपे
बॅंकॉकमधील पोलियांनी 1 मे पासून 763 लोकांना 681 बेटिंग आणि बेकायदेशीर जुगाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
अशाच एका जुगार खेळणाऱ्या माणसाने पोलिसांना सांगितले की, “फुटबॉलवर बेटिंग करणे हे थायलंडमध्ये फार सोपे आहे.”
“जर तुम्ही आता मार्केटमध्ये गेला आणि बेटिंगबद्दल विचारले तर 10 मिनीटांत कोणीही येईल आणि तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल”,असेही त्याने सांगितले.
फिफा विश्वचषकातील पहिला सामना 14 जूनला यजमान रशिया विरूद्ध सौदी अरेबिया यांच्यात लुझिनिकी स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–शुज नसण्याची गोष्ट खोटी, या कारणामुळे भारताने फिफा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली होती!
–एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत थरमॅक्स, इन्फोसिस, बार्कलेज संघांची विजयी सलामी