अमुचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे महापौर अखिल भारतीय पुरुष व राज्यस्तरीय महिला व्यावसायीक कबड्डी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी बडफेरीचे सामने सुरू झाले. महिला विभागात ठाणे मनपा, बँक ऑफ बडोदा, इमराल इन्फ्रा मुंबई व बालवडेकर पाटील व्हेनचर संघानी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
महिला गटात ठाणे मनपा विरुद्ध लेयर टेक्नॉलॉजी नाशिक यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यांत ठाणे मनपा संघाने ४८-१८ असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरुवात पासून आक्रमक खेळ करत ठाणे मनपा संघाने आघाडी कायम ठेवली. चढाईत कोमल देवकर, श्रद्धा पवार तर पकडीत मेघा कदम व पुजा जाधव यांनी चांगला खेळ केला. तर इमराल इन्फ्रा मुंबई संघाने २७-१८ असा जे जे हॉस्पिटल विरुद्ध विजय संपादन करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बँक ऑफ बडोदा संघाने विजयीश्री पुणे संघावर ३१-१५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. बँक ऑफ बडोदा कडून ऋणाली भुवड, पुजा यादव , पोर्णिमा जेधे व पुजा शेलार यांनी चांगला खेळ केला. बालवडेकार पाटील व्हेन्टचरने ४०-१८ असा यादव उद्योग समूह पुणे संघावर विजय मिळवला. सोनाली हेलवी, तृप्ती लांगडे, दीपाली काजले यांनी चांगला खेळ केला.
पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीत आय एस पी एल युवा पलटण संघाने बलाढ्य बी इ जी संघावर ३७-२४ असा विजय मिळवला. युवा पलटण कडून असलम इनामदार, संकेत सावंत, शुभम शिंदे यांनी चांगला खेळ केला. युनियन बँकने ४२-२८ असा न्यू इंडिया इन्शुरन्स संघावर विजय मिलवला. भारत पेट्रोलियमने ३३-१७ असा सेंट्रल बँकेवर विजय मिळवला. तर ठाणे मनपा संघाने ३३-२२ असा जे डी स्पोर्ट्स यु पी संघावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
रात्री शेवटच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारत पेट्रोलियम विरुद्ध ओ एन जी सी झालेल्या सामन्यांत भारत पेट्रोलियम संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर महाराष्ट्र पोलीस संघाने युनियन बँक संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उर्वरित दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज सायंकाळी सत्रात खेळवण्यात येणार आहेत.
महिला विभाग
उपांत्य १:- ठाणे मनपा विरुद्ध इमराल इन्फ्रा मुंबई
उपांत्य २:- बँक ऑफ बडोदा विरुद्ध बालवडेकार व्हेनचर
पुरुष विभाग
उपांत्यपूर्व
उपांत्यपूर्व ३:- एयर इंडिया विरुद्ध आय एस पी एल युवा पलटण
उपांत्यपूर्व ४:- ठाणे मनपा विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा
उपांत्य फेरी
उपांत्य १: भारत पेट्रोलियम विरुद्ध महाराष्ट्र पोलीस
उपांत्य २: उपांत्यपूर्व ३ विरुद्ध ४ विजेते