भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यात संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे महापौर कबड्डी चषक अखिल भारतीय अ श्रेणी पुरुष व राज्यस्तरीय महिला व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.
आज ६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता मा. ना. श्री एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या शुभहस्ते होणार आहे. मा. ना. श्री. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. नरेश गणपत म्हस्के, सभापती, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धा ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल बाजूला, ठाणे येथे पार पडणार आहे. ४ मातीच्या क्रीडांगणवर ही स्पर्धा होणार असून प्रेक्षकांनासाठी भव्य गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्पर्धेत महाराष्ट्रील संघान व्यतिरिक्त दिल्ली, हरियाना येथील संघ सहभागी होणार आहेत.