रांची | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसत आहे. ऑस्टेलियाने ४३.४ षटकांत ५ बाद २६३ धावा केल्या आहेत.
एकवेळ ऑस्ट्रेलिया संघाच्या बिनबाद १९३ धावा होत्या.
याच सामन्यातील ४२व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जडेजा- धोनी जोडीने एक अफलातून धावबाद केला. ३१ चेंडूत ४७ धावा केलेला ग्लेन मॅक्सवेल याचा बळी ठरला.
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शाॅन मार्शने फटका मारला व चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने लगेच चेंडू धोनीकडे फेकला.
परंतु तो चेंडू यष्टीला न लागता हवेतून पुढे जात होता. धोनीने लगेच आपल्या एका हाताने त्या चेंडूची दिशा बदलत थेट यष्टीवर जाण्यास भाग पाडले. यावेळी धोनी स्टंपच्या पाठीमागे न रहाता स्टंप सोडून पिचवर आला होता.
यामुळे मॅक्सवेलला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागला.
https://twitter.com/infiniteflames2/status/1103973864613335040
This man is a genius #Dhoni #IndVsAus #Ranchi @msdhoni pic.twitter.com/yGRiZq2ksS
— Pun-Dit (@Chauthaidiot) March 8, 2019
This man is a genius #Dhoni #IndVsAus #Ranchi @msdhoni pic.twitter.com/yGRiZq2ksS
— Pun-Dit (@Chauthaidiot) March 8, 2019