न्यूझीलंडने दोन महिन्यांनंतर होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2014 च्या टी-20 विश्वचषकात हाँगकाँगकडून खेळणारा फलंदाज मार्क चॅपमनलाही स्थान देण्यात आले आहे. चॅपमनने 2015 मध्ये हाँगकाँगकडून एकदिवसीय पदार्पणात यूएईविरुद्ध शतक झळकावले होते.
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान केन विलियम्सनकडे सोपवण्यात आली आहे. या संघात 27 वर्षीय चॅमपनचाही समावेश आहे.
चॅपमनचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. मात्र, त्याचे वडील न्यूझीलंडचे आहेत. अशा परिस्थितीत त्याला न्यूझीलंड संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. चॅपमनने हाँगकाँगकडूनआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो हाँगकाँगच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला. त्याने 2015 मध्ये यूएईविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्या वनडेमध्ये चॅपमनने 124 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर, त्याने हाँगकाँग सोडून न्यूझीलंडला जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
दोन देशांकडून एकदिवसीय आणि टी -20 दोन्ही खेळलेला चॅपमन
चॅपमन आतापर्यंत 30 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांमध्ये खेळताना दिसला आहेत. यापैकी 19 सामने त्याने हाँगकाँग आणि 11 न्यूझीलंडसाठी खेळले आहेत. त्याने न्यूझीलंड संघासाठी 143 धावा आणि हाँगकाँगसाठी 392 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एक शतक झळकावले आहे आणि ते हाँगकाँगकडून खेळत असतानाच आले आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 4 आणि हाँगकाँगसाठी 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणलेस’ दिनेश कार्तिकचा ‘हा’ फोटो पाहून ऑसी क्रिकेटरचा प्रश्न
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जिंकेल कसोटी मालिका, पाकिस्तानी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातील स्थानही; उर्वरित आयपीएल हंगामात खेळणार का वॉर्नर? घ्या जाणून