IPL 2025 Closing Ceremony: सध्याचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. (Indian Premier League 2025) दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2025 चा समारोप समारंभ आयोजित केला आहे. आयपीएल 2025 च्या या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे यावेळी भारतीय लष्कराचा समारोप समारंभात बीसीसीआयकडून सन्मान केला जाईल. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, या समारोप समारंभात ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी भारतीय सशस्त्र दलांना सन्मान देण्यात येईल.
बीसीसीआयचे सचिव देवजीत साकिया यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, आयपीएल 2025 च्या समारोप समारंभात भारतीय लष्कराचा सन्मान केला जाईल. रिपोर्टनुसार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल दलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. (Indian Army honored for ‘Operation Sindoor’)
यंदाच्या आयपीएलचा फायनल सामना (3 जून) रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. याच मैदानावर सामन्यापूर्वी समारोप समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात लष्करी बँड सादर करू शकतात. यासोबतच, लोकप्रिय गायकांनाही सादरीकरणासाठी बोलावले जाऊ शकते, जसे श्रेया घोषालने आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभात सादरीकरण केले होते. त्याचप्रमाणे, समारोप समारंभात संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाऊ शकते. (When and where will the IPL closing ceremony take place)
बीसीसीआयकडून भारतीय सैन्याचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही लष्करी बँडने आयपीएल उद्घाटन समारंभात सादरीकरण केले होते. त्या वर्षी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सशस्त्र दलांच्या वैयक्तिक कल्याणासाठी 20 कोटी रुपये दिले. त्या काळात, भारतीय सैन्यावर पुलवामा हल्ला झाला होता, ज्यामध्ये 44 सैनिक शहीद झाले होते. तरीही बीसीसीआयने त्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. (BCCI honours Indian Army)