भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात नुकताच एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतरही भारतीय महिला संघाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. भारताकडून पदार्पण करणारी 17 वर्षीय शेफाली वर्माची कामगिरी महत्त्वाची ठरली. तिने दोन्ही डावात अर्धशतकं झळकावताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यादरम्यान, तिची भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागशी तुलना झाली. याबद्दल तिच्या वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेफालीची उत्तम कामगिरी
भारतीय महिला संघाचे सलामीवीर खेळाडू स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या डावात 167 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीमुळे सर्व काही ठीक असल्याचे वाटले होते. परंतु स्मृती 78 धावांवर तर शेफाली 96 धावांवर बाद झाली. यानंतर संघाची गळती सुरू झाली आणि भारतीय संघ २३१ धावांवर सर्वबाद झाला. त्यापूर्वी इंग्लंडने ३९६ धावांवर पहिला डाव घोषित केलेला असल्याने भारताला १६५ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. त्याचमुळे भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. पण दुसऱ्या डावातही शेफालीने उत्तम फलंदाजी करत ६३ धावांची खेळी केली. यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि चाहत्यांनी तिचे कौतुक करताना सेहवागशी तिची तुलना केली.
सेहवागसोबत तुलनेबाबत वडिलांनी केले मत व्यक्त
सेहवागबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल शेफालीच्या वडिलांनी म्हटले आहे की, ‘कोणतीही घाई करत तुलना करू नका आणि तिचे आता प्रथम कर्तव्य आहे की, ती संघांसाठी अधिकाधिक धावा बनवाव्या. आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो की, लोक तिची तुलना एका महान खेळाडू सोबत करत आहेत. परंतु, आम्हाला यामध्येच आनंद आहे की, ती सध्या भारतीय संघासाठी खेळत आहे आणि धावा बनवत आहे.’
शेफालीने कुटुंबासाठी केले ट्विट
शेफालीने आपल्या कुटुंबीयांसाठी आणि तिला आलेल्या शुभेच्छांबद्दल मत व्यक्त करणारे ट्विट केले की, ‘मी तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी आभार मानते. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक उत्तर देणे शक्य नाही. मी भारतीय संघाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. मला माहिती आहे माझे वडील, माझे कुटुंब, माझे असोसिएशन, माझा संघ आणि माझ्या अकॅडमीमध्ये सर्वच लोकांना 4 आणखी धावा व्हायला पाहिजे असे वाटत होते. परंतु मी पुढील सामन्यात नक्की करेन.’
I know my father, my family, my Association, my team and academy will miss those 4+ runs more than me but I will make it up to them on other occasions 😁. They have all been a huge support!
— Shafali Verma (@TheShafaliVerma) June 17, 2021
भारताने वाचवला सामना
सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाचे मधल्या फळीतील फलंदाजी दुसऱ्या डावातही अपयशी ठरले. शेफालीच्या अर्धशतकानंतर पुनम राऊत(३९) आणि दिप्ती शर्माने(५४) डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली होती. पण त्यानंतर मधली फळी कोलमडली. एकवेळ भारतीय संघ सहज पराभूत होईल की काय असे वाटत असताना अखेरीस स्नेह राणा(८०) आणि तानिया भाटीयाने(४४) यांनी नाबाद १०४ धावांची भागीदारी करत सामना अनिर्णित राखला.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल