भारत-इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 4 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. शेवटच्या खेळल्या गेलेल्या पुणे टी20 मध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) भारतीय संघाने 15 धावांनी शानदार विजय मिळवला होता. आता दोन्ही संघातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा टी20 सामना (2 फेब्रुवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी या सामन्याचा टाॅस जिंकून इंग्लंड कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाचव्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
पहिल्या 4 टी20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघातील पहिला टी20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसरा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवत 2-0 आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करत राजकोटच्या मैदानावर 26 धावांनी विजय मिळवला. चौथ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले आणि 15 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. टी20 मालिकेनंतर दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (6 फेब्रुवारी) पासून होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रूपेरी कामगिरी
स्क्वॅशमध्ये डबल धमाका, महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य
राही सरनोबतचे सोनेरी पुनरागमन