चेन्नई। आज आयपीएल2019 मध्ये 44 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला चेन्नईचा नियमित कर्णधार एमएस धोनी मुकणार आहे.
त्याला ताप आल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. धोनी याआधी चेन्नई सुपर किंग्सचे केवळ 4 आयपीएल सामने मुकला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अंतिम 11 जणांच्या संघात न खेळण्याची धोनीची ही केवळ पाचवी वेळ आहे. तसेच यावर्षीच्या मोसमात धोनी चेन्नईकडून दुसऱ्यांदा सामन्याला मुकणार आहे.
याआधी या मोसमात हैद्राबादला 17 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. तसेच त्यापूर्वी मार्च 2010 मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या सलग तीन सामन्यांना मुकला होता.
धोनीसाठी आत्तापर्यंत आयपीएलचा 12 वा मोसम चांगला ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आत्तापर्यंत या मोसमात 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तसेच या मोसमात धोनीने 10 सामन्यात 3 अर्धशतकांसह 314 धावा केल्या आहेत.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकूून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी ऐवजी सुरेश रैना चेन्नईचे नेतृत्व करणार असून अंबाती रायडू चेन्नई संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
आत्तापर्यंत या आयपीएल सामन्यांना मुकला आहे धोनी –
19 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स (दिल्ली)
21 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (चेन्नई)
23 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (बेंगलोर)
17 एप्रिल 2019 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (हैद्राबाद)
26 एप्रिल 2019 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (चेन्नई)
महत्त्वाच्या बातम्या –
–हार्दिक पंड्या पाठोपाठ १७ वर्षीय रियान परागनेही मारला हॅलिकॉप्टर शॉट, पहा व्हिडिओ
–१९ वर्षांपूर्वी वडीलांना तर आता मुलाला यष्टीरक्षक धोनीने केले बाद
–राजस्थानसाठी विजयी खेळी करणारा रियान पराग झाला असा बाद की कर्णधारही झाला चकीत, पहा व्हिडिओ