इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झालेले झाली असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू रतिंदर सिंग सोढ़ी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
रिषभ पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तर, त्याच्यानंतर भारताचे थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयानंद गराणी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यामुळे रतिंदर सिंग सोढ़ी यांनी म्हटले आहे की, खेळाडूंना अधिक जबाबदार होण्याची गरज आहे.
सध्या पंत, गराणी, भारत अरुण, साहा आणि ईश्वरन आयसोलेशनमध्ये असल्याने डरहॅमला गेलेले नाही. डरहॅम येथे भारतीय संघाचे सराव शिबिर सुरु आहे. तसेच इथेच भारतीय संघाला 20 ते 22 जुलै दरम्यान काउंटी सिलेक्ट 11 संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे.
सोढ़ीने एका चॅनेल सोबत बोलताना सांगितले की, संघात खेळणाऱ्या 11 खेळाडूंबद्दल विचार केला असता, जे संघात खेळण्याची शक्यता आहे , अशा खेळाडूंपैकी कोणते खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत, हे देखील पाहणे महत्वाचे आहे. पण आता दोघेही यष्टिरक्षक उपस्थित नाहीत. पंत आणि साहा आयसोलेशनमध्ये आहेत.
सोढ़ी म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही मास्क न घालता बर्याच लोकांसोबत एकाच ठिकाणी जाता, तेव्हा तुम्ही अडचणींना आमंत्रण देत असता. हे तणावाचे वातावरण आहे. तुम्ही गर्दीचे ठिकाण टाळले पाहिजे आणि आवश्यक असल्यास मास्क देखील घाला. जर आपण मास्कशिवाय जात असाल आणि तिथे बरेच प्रेक्षक असतील तर आपण धोक्याला आमंत्रित देत आहोत.’
ते पुढे म्हणाले की, ‘हे खूप वाईट आहे आणि बोर्डाने देखील आपला संताप व्यक्त केला आहे. ते अगदी बरोबर आहे, कारण खेळाडूंनी स्वतःची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. आता प्रार्थना करावी लागेल की सर्व काही ठीक आहे.’
बीसीसीआयने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दिलेल्या ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान पंत त्याच्या मित्रपरिवारासह युरो कप २०२० मधील इंग्लंड विरुद्ध जर्मनीचा सामना पाहाण्यासाठी गेला होता. यावेळी तो विनामास्क सामना पाहात असल्याचे त्याने पोस्ट केलेल्या फोटोमधून दिसत होते. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचे जय-विरू!! रैनाने उलगडले धोनीबरोबरचे खास मैत्रीचे किस्से
जेव्हा केवळ १० वर्षांचा खेळाडू झाला होता ऑलिम्पिकमध्ये सामील, आजही त्याच्याच नावावर आहे ‘हा’ विक्रम