भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला निवृत्ती घेऊन जवळपास एक आठवड्यापेक्षा जास्त कालवधी झाला आहे. तरी त्याच्याविषयीच्या चर्चांना अजूनही विराम लागलेला नाही. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील विक्रम, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील किंवा क्रिकेटमधले किस्से, अशा बऱ्याच विषयांवर अजूनही चर्चा होत आहे. आम्हीही तुम्हाला धोनीच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्साच सांगणार आहोत. The Incident Of MS Dhoni Life When He Started To Earn 6000-7000 Rs Per Day
हा किस्सा आहे, २००२ सालचा. जेव्हा धोनी खडगपूर येथे रेल्वेत टीसीची नोकरी करत होता. त्यावेळी धोनीला प्रत्येक महिन्याला जवळपास ३५०० रुपये मिळत होते. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवणे आणि स्वत:चा खर्च भागवणे, त्याला खूप कठीण जात असायचे. अशात धोनीसोबत असे काही घडले की, त्याचे केवळ क्रिकेट सुधारले नाही तर त्याच्या महिन्याभराच्या कमाईमध्येही वाढ झाली.
झाले असे की, ज्यावेळी खडगपुरमध्ये धोनी नोकरी करत होता, त्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटचा खूप बोलबाला होता. मे-जून महिन्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची महत्त्वाची टूर्नामेंट होत असायची, तर वर्षभरात अनेक छोट्या-मोठ्या टूर्नामेंट चालूच असायच्या. विशेष म्हणजे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या प्रदर्शाननुसार पैसे मिळत असायचे.
टीसीची नोकरी करत असणाऱ्या धोनीला या गोष्टीची भनक लागली आणि त्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. बघता बघता तो या क्रिकेट प्रकारातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा विकासदेखील या टूर्नामेंटमध्येच झाला. एकंदरीत धोनीच्या फलंदाजीवर या टूर्नामेंटचा सकारात्मक प्रभाव पडला.
खडगपुर येथे धोनीसोबत कित्येक वर्षे टेनिस बॉल टूर्नामेंटमध्ये खेळलेल्या एका सहकाऱ्याने सांगितले की, “टेनिस बॉल टूर्नामेंटमध्ये १०-१२ षटकांचे सामने होत असायचे. या सामन्यांचा धोनी हा मॅच विनर होता. प्रत्येक संघाला धोनीला आपल्या संघाकडून खेळवायचे होते. धोनी त्यावेळचा सर्वात महागडा खेळाडू होता.”
“धोनीला या टूर्नामेंटमध्ये सुरुवातीला प्रत्येक सामन्यामध्ये ६००-७०० रुपये मिळत असायचे. पण, नंतर एका सामन्यातून त्याला १५०० रुपये मिळू लागले. धोनी त्यावेळीही खूप फिट होता. तो सलग ४-५ दिवस सामने खेळत असायचा. त्यामुळे पुढे त्याला टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांतून दर दिवशी ६-७ हजार रुपये मिळू लागले. धोनीला त्याच्या या अतिरिक्त कमाईची खूप मदत झाली,” असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
सुरेश रैनाच्या कुटुंबियांवर झाला हल्ला; एका नातेवाईकाचा झाला मृत्यू तर…
दोन दिग्गजांचे विक्रम मोडलेल्या भारताच्या जावयाच्या निशाण्यावर सचिनचा मोठा विक्रम
टिंगल सुरु झाली तर! संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्स घेतंय फिरकी?
ट्रेंडिंग लेख –
बापरे! तुमची लाडकी मुंबई इंडियन्स युएईत रहाते अतिशय महागड्या हॉटेलात, एका दिवसाचे भाडे…
एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक