पुणे (14 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना नाशिक विरुद्ध लातूर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत 1 विजय व 1 पराभव अशी कामगिरी होती. नाशिकच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत गुण मिळवले. ईश्वर पथाडे व पवन भोर यांच्या चपळ चढाया आणि बचावपटूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर नाशिक संघाने 6 व्या मिनिटाला लातूर संघाला ऑल आऊट केले. सामन्याच्या 11 व्या मिनीतला लातूर संघाला पहिला गुण मिळाला.
नाशिक संघाने 18-01 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती. त्यानंतर मध्यंतरा पर्यत नाशिक संघाने 31-09 अशी आघाडी मिळवत सामन्यावर पकड मजबूत केली होती. पवन भोर ने आपला सुपर टेन पूर्ण केला. ईश्वर पथाडे ने अष्टपैलू खेळ करत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
नाशिक संघाने मध्यंतरा नंतर ही आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामना आपल्या मुठीत ठेवला. संपूर्ण सामन्यात नाशिक संघाने लातूर संघाला 5 वेळा ऑल करत सामना 68-22 असा जिंकला. नाशिक कडून पवन भोर ने सर्वाधिक 17 गुण मिळवले. तर ईश्वर पथाडे ने चढाईत 11 तर पकडीत 3 गुण मिळवले. ओंकार पोकळे ने पकडीत 5 तर सिद्धांत संदनशिव ने पकडीत 4 गुण मिळवले. लातूर कडून अजिंक्य कटले ने सर्वाधिक 12 गुण मिळवले. (The Nashik team got their second win by defeating the Latur team)
बेस्ट रेडर- पवन भोर, नाशिक
बेस्ट डिफेंडर- ओंकार पोकळे, नाशिक
कबड्डी का कमाल – गणेश गीते, नाशिक
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । ‘मी यावर्षी सर्वात कमी धावा केल्या’, विजेतेपदानंतर काय म्हणाला कॅप्टन रहाणे
युवा कबड्डी सिरीज मध्ये पालघर, नंदुरबार संघाचा सलग दुसरा विजय