शेवटी युवराज सिंग आणि सुरेश रैना या एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघातून बाहेर का बसवण्यात आले याचे कारण पुढे आले आहे. बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीए येथे पार पडलेल्या यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये फेल ठरल्यामुळे त्यांना भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले.
सध्याच्या काळात भारतीय संघातील खेळाडूंना नेहमीच यो यो एन्ड्युरन्स टेस्टला सामोरे जावे लागते. बीप टेस्टचे पुढचे व्हर्जन म्हणून यो यो एन्ड्युरन्स टेस्ट प्रसिद्ध आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे संघात निवड होण्यासाठी यो यो टेस्टचा स्कोर हा १९.५ असावा लागतो. परंतु सुरेश रैना आणि युवराज सिंग यांचा हा स्कोर हा अंदाजे १६च्या आसपास आला तर विराट कोहली आणि एमएस धोनी यांचा स्कोर अंदाजे१९. च्या पुढे होता.
हाच स्कोरच रैना आणि युवराज यांना संघाबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. मनीष पांडे, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली हे तीन खेळाडू नेहमीच १९. ५ किंवा त्याच्या आसपास यो यो स्कोर मिळवतात.
विराट पेक्षाही मनीष पांडे जास्त फिट
एबीपी न्युजमधील एका रिपोर्ट्स प्रमाणे विराट कोहलीपेक्षाही जास्त स्कोर असलेला खेळाडू हा मनीष पांडे होता. या टेस्टमध्ये मनीष पांडे पहिला, विराट कोहली दुसरा तर एमएस धोनी तिसरा राहिला.