---Advertisement---

इराणी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा, रूतुराज गायकवाड कर्णधार…!

---Advertisement---

आगामी इराणी कपसाठी भारताच्या नियामक मंडळाने (BCCI) रेस्ट ऑफ इंडिया (Rest Of India) संघाची घोषणा केली आहे. या संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद युवा स्टार खेळाडू रूतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) सोपवले आहे. दुलीप ट्राॅफीच्या स्पर्धेतनंतर (Duleep Trophy) रूतुराज गायकवाड पुन्हा एकदा कर्णधार म्हणून मैदानात उतरताना दिसणार आहे.

इराणी कपमध्ये (Irani Cup) 2023-24च्या रणजी ट्राॅफीचे मानकरी ठरलेल्या मुंबईचा सामना रेस्ट ऑफ इंडिया संघाशी होणार आहे. हा सामना (1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर) दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

इराणी कपसाठी भारताचा संघ- रुतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, सारांश जैन, प्रसीध क्रिष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर

 

महत्त्वाच्या बातम्या-

सचिनच्या मुलाची देशांतर्गत क्रिकेटमधून करोडोंची कमाई! त्याची एकूण संपत्ती किती?
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत पडणार रेकाॅर्ड्सचा पाऊस? ‘हे’ दिग्गज रचणार इतिहास
“त्याला शांत करावे लागेल” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---