---Advertisement---

IPL इतिहासात RCB ची प्लेऑफमधील कामगिरी कश्या प्रकारची? पाहा संपूर्ण आकडेवारी

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) संघात खेळला जाणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांच्या नजरा अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्यावर असतील. या हंगामात दोन्ही संघ दोन वेळा समोरासमोर आले आहेत. दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध विजय आणि पराभव दोन्ही मिळालेला आहे. सध्या आपण आकड्यांवर नजर टाकू ज्यामुळे प्लेऑफमध्ये कोणत्या संघाच पारडं जड आहे हे समजेल.

आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत दोन्ही संघात खेळलेल्या 35 सामन्यात 18 विजय पंजाबने मिळवले आहेत तर 17 सामन्यात आरसीबीला विजय मिळाला आहे. 2023 पासून पहायला गेल्यास, दोन्ही संघात खेळलेल्या 5 सामन्यात 4 वेळा आरसीबीने विजय मिळवला आहे.

दोन वेळा आरसीबीने क्वालिफायर एक मध्ये स्थान बनवले आहे. आयपीएल 2011 मध्ये चेन्नई विरुद्ध त्यांचा पराभव झाला.

आरसीबी आयपीएल इतिहासात चेन्नई आणि मुंबई नंतर सर्वात जास्त वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणारा संघ आहे. आरसीबीने 6 आयपीएल हंगामामध्ये 5 वेळा प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित केले होते. कोणत्याही संघाच्या तुलनेत हे सर्वात जास्त वेळा आहे. आरसीबी आयपीएलच्या इतिहासात एक मात्र संघ आहे, ज्या संघाने आयपीएल हंगामात त्यांचे सर्व (7/7) सामने जिंकले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---