बेंगलोर | १४ जून ते १८ जून दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये १ सामन्याची कसोटी मालिका होत आहे. हा एकमेव सामना चिन्नस्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे होणार आहे.
यासाठी सामन्यांचे दर अतिशय कमी ठेवण्यात आले आहेत. या सामन्यासाठी सुरूवातीच्या तिकिटांची किंमत चक्क ५० रुपये आहे तर सर्वात महागडे तिकीट हे २००० रुपयांना आहे.
५० ते ५००, ५०० ते १००० आणि १०००च्या पुढे असे हे प्रत्येक दिवसासाठीचे दर आहेत.
हा सामना अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना ठरणार आहे. यासाठी तिकीटांची विक्री हा पेटीएम या वेबसाईटवर ९ जूनपासून सुरु झाली आहे. तसेच चिन्नस्वामी स्टेडियमच्या गेट नंबर २वरही याची विक्री सुरु आहे.
कालच या संघाचे आगमन बेंगलोर शहरात झाले आहे. अफगाणिस्तान संघ गेले काही दिवस भारतातचं असुन डेहराडून येथे झालेल्या ३ टी२० सामन्यांत त्यांनी बांगलादेशला ३-० अशी धूळ चारली होती.
आमचा संघ आत्मविश्वासाने खेळणार असून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास अफगाणिस्तानचा कर्णधार अश्घर स्टॅनिकझाईने व्यक्त केला आहे.
या सामन्यात भारतीय संघाच नेतृत्व अजिंक्य रहाणे करत असून कसोटी संघाचा कर्णधार म्हणुन त्याचा हा दुसराच सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाचे बेंगलोर शहरात आगमन
–भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता
-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत डेव्हिड वार्नरकडे मोठी जबाबदारी