इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगाम शुक्रवारी (22 मार्च) सुरू होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज आहेत. काही नवीन चेहरे कर्णधार म्हणून पहिल्यांदा खेळत आहेत. आयपीएलमध्ये हा नेहमीच फलंदाजांचा खेळ ठरत आला आहे. कारण याठिकाणी चौकार-षटकारांचा पाऊस पडाना दिसला आहे. आगामी हंगामात देखील असेच चित्र पुन्हा एकदा दिसणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक खेळाडू आयपीएल खेळल्यानंतर देशासाठी खेळले आहेत. पण या लीगमध्ये असेही खेळाडू आहेत, जे विदेशी असून भारतात त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. आयपीएलमध्ये धडाकेबाज प्रदर्शनाच्या जोरावरच या विदेशी खेळाडूंना भारतात मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम मिळाले. आपण या लेखात अशाच तीन विदेशी खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे आगामी आयपीएल हंगामात धावांचा पाऊस पाडू शकतात.
3. क्विंटन डी कॉक (लखनऊ सुपर जायंट्स)
लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याच्यावर आगामी आयपीएल हंगामात सर्वांच्या नजरा असतील. डी कॉक मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये लखनऊकडून खेळत आहे. त्याने संघासाठी चांगल्या धावा देखील केल्या आहेत. मागच्या हंगामात त्याला चार सामन्यांमध्येच खेळता आले. पण यावेळी तो नक्कीच सर्व सामन्यांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी 2022 हंगामात त्याने 500पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. डी कॉक संघासाठी पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. अशात यावर्षीही त्याच्या बॅटमधून काही मोठ्या खेळी पाहायला मिळू शकतात.
2. डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स)
डेव्हिड वॉर्नर वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता त्याचे संपूर्ण लक्ष टी-20 क्रिकेटवर असणार आहे. अशात हा फलंदाज आयपीएल 2024 मध्ये विरोधकांसाठी घातक ठरू शकतो. वॉर्नरकडे एकट्याच्या जोरावर सामना जिंकवण्याची क्षमता आहे. यावर्षी तो हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरू शकतो. मागच्या हंगामात देखील त्याने सर्वोत्तम प्रदर्शन करत 500+ धावा केल्या होत्या.
1. जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
जोस बटलर मागच्या अनेक हंगामांपासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आहे. त्याने सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. मागच्याही हंगामात त्याचे प्रदर्शन उत्तम राहिले आणि एकूण 392 धावा त्याने केल्या होत्या. तसेच 2022 हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. यावर्षी देखील बटलर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडत सर्वाधिक धावा करू शकतो. राजस्थानला ट्रॉफी जिंकण्यासाठी देखील बटलरची बॅट तळपणे महत्वाचे असेल. (These three batsmen can score the most runs in the IPL this year)
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ऐन वेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज आयपीएल हंगामातून बाहेर
या वर्षी विजेतेपदावर नाव कोरणार हा संघ? एबी डिव्हिलियर्सने घेतलं या संघाचं नाव