क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाजांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सलामी जोडीने जर चांगली सुरुवात केली तर संघाला मोठी धावसंख्या उभारता येते. सलामीवीरांच्या चांगल्या खेळीमुळे संपूर्ण संघाचे मनोबल वाढत असते व त्याचा विजयी परिणाम बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतो.
क्रिकेट इतिहासात बरेचसे दिग्गज सलामी फलंदाज होऊन गेले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, नजफगडचा सुलतान वीरेंद्र सेहवाग, सईद अन्वर, मॅथु हेडन, ग्रॅमी स्मिथ हे सर्व आपापल्या काळातील जबरदस्त सलामी फलंदाज म्हणून गाजलेले आहेत. यापैकी बऱ्याच खेळाडूंनी मधल्या किंवा खालच्या फळीतील फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. परंतु नंतर त्यांनी सलामीवीर म्हणून संधी मिळताच त्या संधीचे सोने केले.
रोहित शर्मा आधी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. परंतु त्याची प्रतिभा ओळखून तत्कालिन कर्णधार एमएस धोनीने त्याला सलामीवीर म्हणून बढती दिली. रोहितप्रमाणे आता भारतीय क्रिकेट संघातही असे काही फलंदाज आहेत, जर त्यांना सलामीवीर म्हणून संधी मिळाली; तर ते अनेक मोठेमोठे किर्तीमान करू शकतात. अशाच काही फलंदाजांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
3) शिवम दुबे :-
शिवम दुबे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा खेळाडू आहे. तो आतापर्यंत भारताकडून फक्त 1 एकदिवस आणि 13 टी20 सामने खेळला आहे आणि आयपीएलमध्ये सुद्धा त्याला फक्त 21 सामने खेळता आले आहेत. दुबेने आतापर्यंत भारतीय संघासाठी मधल्या फळीत निर्णायक भूमिका पार पाडली आहे. तो एक विस्फोटक फलंदाज असून त्याला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. जर त्याला सलामीला यायची संधी मिळाली; तर तो संघासाठी आक्रमक सुरवात करून देऊ शकतो.
डावाच्या सुरुवातीला फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर राहत असल्यामुळे त्याच्या त्याला मोठ्या प्रमाणात फायदा उचलता येईल. शिवम दुबेला बढती देऊन सलामीवीर म्हणून पाठवणे ही एक चांगली रणनिती ठरू शकते.
2) सुर्यकुमार यादव:-
सूर्यासारखा तेजस्वी सुर्यकुमार यादव अफाट गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्याने आपली गुणवत्ता वेळोवेळी राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात धावांचा डोंगर उभा करून दाखवून दिली आहे. सुर्यकुमार असा खेळाडू आहे जो क्रिकेटच्या तिनही प्रकारात जबरदस्त कामगिरी करू शकतो. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सुर्यकुमारने कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु नंतर त्याला मध्यक्रमात फलंदाजीला पाठवण्यात आले. जर त्याला भारतीय संघातही सलामीवीर म्हणून संधी मिळाली तर तो जबरदस्त कामगिरी करू शकतो. सुर्यकुमारमध्ये अशी क्षमता आहे की तो डावाला सांभाळत असताना सुद्धा विस्फोटक फलंदाजी करू शकतो.
1) रिषभ पंत:-
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणून आज रिषभ पंत ओळखला जातो. त्याच्यात एवढी क्षमता आहे की तो एकटा सामान्यचे चित्र पालटू शकतो. त्याच्याकडून चौकार-षटकारांची चौफेर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. रिषभ पंतसुद्धा सलामीवीर म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून अतिशय चांगले प्रदर्शन करत असून मधल्या फळीत वेळोवेळी त्याने बऱ्याच धावाही केल्या आहेत.
याचे कारण कसोटी सामन्यांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक फलंदाजांच्या जवळ असतात. सीमारेषेवर कमी क्षेत्ररक्षक असतात आणि पंत त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतो. रिषभ पंतने मर्यादित षटकांच्या सामन्यात डावाची सुरुवात केली; तर पॉवरप्लेच्या नियमाचा फायदा उचलून तो संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
विलगीकरणात ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘असे’ राहतात तंदुरुस्त, उपकर्णधाराने केला खुलासा
विश्वचषकात सर्वाधिक धावा करत या ३ भारतीयांनी जिंकली होती ‘गोल्डन बॅट’
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल