भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र भारतीय संघाने साफ निराशा केली. वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व राहिले. भारतीय संघाने दोन्ही सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा केल्या परंतु, तरीही ऑस्ट्रेलिया संघ भारताला वरचढ राहिला. त्यामुळे अखेर भारताला ही मालिका गमवावी लागली.
परंतु, तिसर्या वनडे सामन्यात आणि टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला आपल्या चुका सुधाराव्या लागतील. त्यासाठी त्यांना संघही योग्य निवडावा लागेल, जेणे करुन कमीत कमी तिसर्या वनडे सामन्यात विजय मिळवून मालिकेत व्हाईटवॉश टाळता येईल. त्यामुळे या लेखात आपण भारतीय संघात तिसऱ्या वनडेसाठी कोणते तीन बदल केले जावू शकतात, हे जाणून घेवू.
नवदीप सैनीच्या जागेवर नटराजनला संधी
नवदीप सैनी चांगल्या वेगाने गोलंदाजी करत असला तरी त्याच्यात लाईन आणि लेंथची कमतरता भासत आहे. त्यामुळे त्याच्या वेगाचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना होत आहे. एवढेच नाही तर नवदीप सैनीवर अंतिम षटकात विश्वास ठेवला जावू शकत नाही. त्याचा याॅर्कर अचूक ठिकाणी पडत नाही. अशात भारतीय संघात नटराजनचा समावेश करून त्याला तिसर्या सामन्यात गोलंदाजी दिली जाऊ शकते. त्याचा याॅर्कर अचूक टप्प्यावर पडतो आणि तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीत विविधता येईल.
तसेच जर नटराजनला तिसऱ्या वनडेत भारताच्या 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना ठरेल.
चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी
चहलने पहिल्या दोन सामन्यात त्याच्या गोलंदाजीने निराश केले. या फिरकीपटूला दोन सामान्यात फक्त एकच गडी बाद करता आला. त्याने पहिल्या सामन्यात 89 आणि दुसर्या सामन्यात 71 धावा दिल्या. आता त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. कुलदीप यादव हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जरी महागडा गोलंदाज ठरला तरी त्यानी 15 सामन्यात 22 बळी घेतले आहेत.
मयंक अगरवालच्या जागी शुभमन गिलला संधी
मयंक अगरवालने दोन्ही वनडे सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र दोन्हीवेळी बेजबाबदार फटके खेळून तो बाद झाला. भारतीय संघाकडे शुभमन गिलच्या रूपाने एक युवा फलंदाज उपलब्ध आहे. त्याचा तिसर्या वनडे सामन्यात उपयोग केला जावू शकतो. शुभमन वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे खेळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
‘त्याला’ गोलंदाजी दिल्याने योजनेचा खुलासा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराटचे भाष्य
स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी ‘भीतीदायक’, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची प्रतिक्रिया