अलिकडच्या काळात क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचन करणारे समालोचक वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी कधी भावनेच्या भरात निघून गेलेला चुकीचा शब्द त्यांना चांगलाच भारी पडतो. बीसीसीआयने भारतीय समालोचक संजय मांजरेकर यांना आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकले होते. त्यामुळे मांजरेकर यांचा आवाज व ते प्रत्यक्ष कोणत्याही सामन्यादरम्यान दिसले नाहीत. मात्र, असे असले तरीही ते लवकरच क्रिकेट समालोचन करताना दिसणार आहेत.
क्रिकेट सामन्यांत समालोचन करत असताना अनेक वादग्रस्त वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका व आरोपदेखील झाले होते. मागील वर्षी विश्वचषकात अष्टपैलू रवींद्र जडेजा व इतर काही खेळाडूंवर त्यांनी टिप्पणी केली होती. ज्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली होती. बीसीसीआयने संजय मांजरेकर यांना आयपीएल 2020 च्या कॉमेंट्री पॅनलमधून देखील वगळूले होते.
संजय मांजरेकर आणि सोनी पिक्चर्स करार
पुढील काही दिवसांत आयपीएल संपणार असून लवकरच भारत- ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यावर संजय मांजरेकर पुनरागमन करताना दिसणार आहेत. भारताचा संघ ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील मालिका खेळणार आहे.
साधारण दोन महिने एक आठवडा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याचे प्रक्षेपण हे सोनी पिक्चर्स करणार आहेत. समालोचक म्हणून सोनी पिक्चर्सने संजय मांजरेकर यांच्यासोबत करारदेखील केला आहे. संजय मांजरेकर यांच्या समवेत हर्षा भोगले, मायकल क्लार्क, ग्लेन मॅकग्रा आणि अँड्र्यू सायमंड्स हे माजी खेळाडू देखील समालोचन करताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी… ऐका समालोचक संजय मांजरेकरांच्या आवाजात
-आयपीएल समालोचकांच्या यादीतून दिग्गजाला वगळले, आता हर्षा भोगलेसह फक्त…
-फेक फॉलोवर्स रॅकेट: ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट समालोचकाची होणार चौकशी, मुंबई पोलिसांंनी पाठविले समन्स
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार