ऑकलँड। आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 273 धावा केल्या आहेत आणि भारताला 274 धावांचे आव्हान दिले आहे.
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी मधल्या काही षटकात चांगली गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला होता. मात्र असे असतानाही जसप्रीत बुमराहला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 64 धावा दिल्या.
त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले की त्याने सलग तीन वनडे सामन्यात एकही विकेट घेतलेली नाही.
याआधी 5 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध हेमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातही बुमराहने 10 षटके गोलंदाजी करताना 53 धावा दिल्या होत्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तसेच त्याआधी 19 जानेवारीला बंगळुरु येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बुमराहने 10 षटकात एकही विकेट न घेता 38 धावा दिल्या होत्या.
बुमराहने यावर्षी जानेवारीमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन केल्यावर आत्तापर्यंत 5 वनडे सामन्यात गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याला केवळ 1 विकेट घेण्यात यश आले आहे. त्याने ही विकेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 जानेवारीला राजकोटला झालेल्या सामन्यात घेतली आहे.
टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत केला हा भीमपराक्रम
वाचा👉https://t.co/6uirRjsbOC👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDWvsAUSW— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
…म्हणून शतक केल्यानंतर जीभ बाहेर काढून रॉस टेलर करतो अनोखे सेलिब्रेशन
वाचा👉https://t.co/WqU3qovY5m👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020