दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात रविवारी(3 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला.
हा विजय बांगलादेशसाठी खास ठरला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवला आहे.
या सामन्याआधी भारत-बांगलादेशमध्ये 8 टी20 सामने झाले होते. या आठही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. परंतू रविवारी बांगलादेशने भारताविरुद्ध 9 वा टी20 सामना खेळताना पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश संघात सर्वात पहिला टी20 सामना 6 जून 2009 ला झाला होता. तेव्हा पासून आत्तापर्यंत या दोन संघांनी एकमेकांविरुद्ध 9 सामने खेळले आहेत.
या विजयाबरोबरच बांगलादेशने भारताविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता पुढील टी20 सामना 7 नोव्हेंबरला राजकोट येथे होणार आहे.
दिल्ली टी20 ला होते ऐतिहासिक महत्त्व-
भारत-बांगलादेश संघात दिल्लीमध्ये रविवारी पार पडलेला टी20 सामना हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासातील 1000 वा सामना होता.