---Advertisement---

आयपीएल स्पर्धेतून CSK बाहेर पडल्यानंतर धोनी भावूक, जाणून घ्या काय म्हणाला?

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफ मधून चेन्नई सुपर किंग्ज संघ बाहेर पडला आहे. बुधवार 30 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सवर पंजाबने चार विकेट्सने विजय मिळवला. यानंतर चेन्नईचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंग झालं आहे.

या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज दोन विजय आणि आठ पराभवांसोबत पॉईंट्स टेबलवर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. चेन्नईच्या पराभवानंतर चाहते खूप नाराज आहेत, तसेच महेंद्रसिंग धोनी सुद्धा खूप दुःखात आहे. जाणून घ्या पराभवानंतर तो काय म्हणाला?

पंजाब किंग्स विरुद्ध पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, “ही पहिली वेळ आहे जेव्हा आम्ही मर्यादित धावा केल्या पण ही धावसंख्या योग्य होती का? कदाचित थोड्या धावा कमी पडल्या. मला वाटते की, आम्ही अजून थोड्या धावा करू शकलो असतो. आम्हाला सर्व कॅच पकडायला हवे होते.

तो पुढे म्हणाला मला वाटते की, करण एक योद्धा आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे. दुर्दैवाने जेव्हा आम्ही त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा, त्याने हळू गतीने विकेट्स घेतल्या आहेत. पण आज घेतलेल्या विकेट्स हंगामातील घरेलु मैदानावर आमच्यासाठी सर्वात चांगल्या विकेट्स होत्या. ब्रेविसकडे चांगली ताकद आहे. तो एक शानदार क्षेत्ररक्षक आहे. तो मैदानात सुद्धा ऊर्जेने खेळतो, तो
येणाऱ्या हंगामासाठी एक चांगला खेळाडू ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---