भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी येथे सुरू असलेला कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी तितकासा चांगला ठरलेला नाही. पेन ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केवळ 1 धावेवर बाद झाला. तसेच भारताच्या पहिल्या डावामध्ये त्याने दोन वेळा रिव्यू घेऊनही त्यात त्याला अपयश आले. यावेळी पेन चांगलाच नाराज दिसला व त्याने मैदानावर आंपार विरुद्ध अपशब्द वापरले असल्याची चर्चा होत आहे.
भारताच्या पहिल्या डावात पेनने पहिला रिव्ह्यू घेतला तो चेतेश्वर पुजारा विरुद्ध. नॅथन लायनच्या एका चेंडूवर पुजारा फसला व चेंडू शॉर्ट लेगवरील खेळाडूने पकडला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात अपिल करूनही अंपायरने पुजाराला नाबाद घोषित केले. यानंतर टीम पेनने रिव्ह्यू घेतला. मात्र, त्यात पुन्हा एकदा पुजाराला नाबाद घोषित करण्यात आले.
अंपायरांच्या या निर्णयावर पेन चांगलाच नाराज झालेला दिसला. पेनच्या मते जेव्हा चेंडू बॅटच्या जवळून गेला तेव्हा स्निकोमीटरमध्ये थोडीशी हालचाल जाणवली होती. पेनने कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत, मेलबर्न येथील कसोटी सामन्यात त्याला असेच बाद दिले गेले होते, याची आठवणही अंपायरला करून दिली .
या नंतर पेनने दुसरा रिव्ह्यू घेतला तो रिषभ पंत विरुद्ध. लाबुशानेच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्यात पंत चुकला व पेनने चेंडू पकडला. यावेळी अंपायरने पंतला नाबाद घोषित केले. पेनने पुन्हा रिव्ह्यू घेतला मात्र या वेळी देखील पंतला नाबादच घोषित करण्यात आले.
The Aussies thought they had it but the decision remains not out! #AUSvIND pic.twitter.com/QT3HQD3DPW
— News Cricket (@NewsCorpCricket) January 9, 2021
Australia lose a review trying to prize out Pujara. Another fantastic decision by the umpire #AUSvIND pic.twitter.com/k1coiuhI1W
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 338 धावांवर सर्वबाद झाले. त्यानंतर भारताचा पहिला डाव केवळ 244 धावांवर आटोपला.
महत्त्वाच्या बातम्या –
जॉस हजलेवुडच्या शानदार थ्रोवर हनुमा विहारी धावबाद, बघा व्हिडिओ
AUS vs IND : रिषभ पंतनंतर टीम इंडियाला आणखीन एक धक्का, जडेजा मैदानाबाहेर
अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल