आज(24 जानेवारी) भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध न्यूझीलंड असे तब्बल तीन वेगवेगळे सामने पहाण्याची संधी आहे. आजपासून वरिष्ठ भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होत आहे. आज वरिष्ठ भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी20 सामना होणार आहे.
हा सामना ऑकलँड येथे इडन पार्क मैदानावर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 12.20 ला या सामन्याला सुरुवात होणार आहे.
तसेच त्याआधीच भारतीय अ संघही न्यूझीलंड दौऱ्यावर आलेला आहे. त्यांचा आज न्यूझीलंड अ संघाविरुद्ध हॅग्ली ओव्हल, ख्राइस्टचर्च येथे दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंड अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी 296 धावांचे आव्हान ठेवले आहे.
त्याचबरोबर आज दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील आयसीसी वनडे विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील न्यूझीलंड संघात साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. हा सामना मँगाउंग ओव्हल, ब्लॉमफॉन्टेन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यापाठोपाठ आता 'या' सामन्यांनाही मुकणार शिखर धवन?
वाचा👉https://t.co/CJQF8Dog7l👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया
वाचा- 👉https://t.co/fJtqLASyo4👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020