कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी 50 लाखांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सने मोजली आहे. तर ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने 10 कोटी 75 लाखांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.
तसेच ख्रिस मॉरिसला 10 कोटींची बोली लागली आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 10 कोटी रुपये मोजत संघात सामील करुन घेतली आहे. तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मात्र डेल स्टेन, मार्टिन गप्टील, टीम साउदी असे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणत्याही संघाने पसंती दाखवलेली नाही.
संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडे ठरलेले खेळाडू-
15 कोटी 50 लाख – पॅट कमिन्स – कोलकाता नाईट रायडर्स
10 कोटी 75 लाख – ग्लेन मॅक्सवेल – किंग्स इलेव्हन पंजाब
10 कोटी – ख्रिस मॉरिस – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
8 कोटी 50 लाख – शेल्डन कॉट्रेल – किंग्स इलेव्हन पंजाब
8 कोटी – नॅथन कुल्टर नाईल – मुंबई इंडियन्स
7 कोटी 75 लाख – शिमरॉन हेटमायर – दिल्ली कॅपिटल्स
6 कोटी 75 लाख – पियुष चावला – चेन्नई सुपर किंग्स
5 कोटी 50 लाख – सॅम करन – चेन्नई सुपर किंग्स
आयपीएल २०२०मध्ये दिसणार नाही जहीर खान!
https://t.co/WYM24HuNPD#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे २ मोठे खेळाडू https://t.co/JQ69m6Yjfq#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019