क्रिकेट हा असा खेळ आहे की, ज्यामध्ये उंच किंवा बुटके हे खेळाडू एकसमान कामगिरी करताना दिसतात. आपल्या कौशल्याच्या जोरावर ते क्रिकेटच्या मैदानावर छाप पाडतात. या खेळामध्ये उंच खेळाडू, बुटके खेळाडू आणि अगदी शरीराने जाड असलेल्या खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर यांची उंची कमी आहे. परंतु क्रिकेटविश्वामध्ये त्यांची खाती सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. याच विषयाला अनुसरून आज आपण या लेखांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात उंच खेळाडूंची माहिती पाहणार आहोत.
1) मोहम्मद मुदस्सर
पाकिस्तान गोलंदाज मोहम्मद मुदस्सर यांची उंची सात फूट चार इंच इतकी आहे. अद्याप त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहात आहेत. जर मुदस्सर यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले तर ते सर्वात उंच खेळाडू ठरतील. आतापर्यंत मुदस्सर पीएसएलमध्ये खेळत होते. ते एक अष्टपैलू आहेत. परंतु सध्या त्यांचे वय 40 आहे. यामुळे त्यांचे पाकिस्तान संघासाठी खेळणे खूप अवघड झाले आहे.
https://twitter.com/KamranCanada/status/1230304633500897284?s=20
2) मोहम्मद इरफान
पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद इरफान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात उंच खेळाडू आहे. मोहम्मद इरफानची उंची 7 फूट 1 इंच इतकी आहे. इरफान हे आपल्या उंचीचा फायदा घेऊन फलंदाजाला आपल्या गोलंदाजीने हैराण करतात. विशेष म्हणजे इरफान हे आपल्या उंचीमुळे बाउन्सर चेंडू खूप सहजतेने टाकताक. ज्यामुळे फलंदाजाला त्यांच्या गोलंदाजीवर खेळता येत नाही.
3) ब्रूस रीड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात उंच खेळाडूंच्या यादीत ब्रुस रेड यांचा तिसरा क्रमांक लागतो. त्यांची उंची सहा फूट आठ इंच इतकी आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल की, रीड हे भारतीय क्रिकेट गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. ऑस्ट्रेलियाचे ब्रूस रेड हे त्यांच्या काळात बाउन्सर चेंडू टाकणारे श्रयस्कर गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. जेव्हा ते गोलंदाजी करायला यायचे तेव्हा फलंदाज अगदी डोळ्यात तेल घालून फलंदाजी करत होते.
https://twitter.com/ICC/status/841529326919122944?s=20
4) जोएल गार्नर
वेस्टइंडीज संघाचे गोलंदाज जोएल गार्नर याची उंची 6 फूट 8 इंच इतकी आहे. गार्नर गोलंदाजीमध्ये आपल्या उंचीचा फायदा घेऊन फलंदाजांना बाउन्सर चेंडू टाकतो. गार्नर हा बाउन्सर आणि यार्कर गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत टाकतो. जोएल गार्नरला ‘बिग बर्ड’ या नावाने देखील संबोधले जाते.
https://twitter.com/SomersetCCC/status/1399697447539073036?s=20
5) पीटर जॉर्ज
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर जॉर्जची उंची 6 फूट 6 इंच इतकी आहे. 2010 मध्येच जॉर्जने भारत विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर त्याने कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले नाहीत.
6) काइल जैमीसन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जैमीसन याची उंची 6 फूट 6 इंच इतकी आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघामध्ये जैमीसन हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.
7) कर्टली एम्ब्रोज
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोज हे जगात प्रसिद्ध खेळाडू आहेत. वेस्टइंडीज क्रिकेटमध्ये कर्टली एम्ब्रोज यांची कामगिरी खूप मोठी आहे. वेस्टइंडीजच्या या वेगवान गोलंदाजांची उंची 6 फूट 7 इंच इतकी आहे.
8) क्रिश ट्रेमलेट
इंग्लंड संघाचा माजी वेगवान गोलंदाज क्रिश ट्रेमलेट याची उंची 6 फूट 7 इंच आहे. ट्रेमलेट क्रिकेट कारकिर्दीत 12 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 53 बळी घेतले आहेत. याच्या व्यतिरिक्त 15 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 15 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा रंगणार आयपीएल २०२१चा थरार! उर्वरित हंगामाला ‘या’ दिवशी युएईमध्ये होणार सुरुवात
रोहितच्या भिडूने ८ वर्षांच्या वयात पाहिले होते ‘हे’ मोठे स्वप्न, दुर्दैवाने जवळ पोहोचूनही राहिला दूर
अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताच भारतीय संघातून हे ३ खेळाडू झाले गायब