भारतीय संघ या महिन्याच्या शेवटी न्यूझीलंड दौऱ्यावर (India Tour of New Zealand) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत न्यूझीलंडविरुद्ध 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने, 3 वनडे सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. परंतु यापूर्वी न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसनने (Mike Hesson) भारतीय संघाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
या दौऱ्याविषयी बोलताना हेसन म्हणाला की, भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेतृत्व करणाऱ्या भारतीय संघासाठी न्यूझीलंड दौरा कठीण असेल. तसेच वनडेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांच्यामध्ये चुरशीची लढत पहायला मिळेल.
“न्यूझीलंडला घरच्या मैदानात पराभूत करणे कठीण आहे. तुम्ही त्यांची सध्याची आकडेवारी पाहू शकता जी अप्रतिम आहे. भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट आहे. त्यामुळे ही मालिका चुरशीची होईल,” असे टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या जुन्या संघाची प्रशंसा करताना हेसन म्हणाला.
“जर थोडा स्विंग मिळेल तेव्हा वनडेत ‘ट्रेंट बोल्ट विरुद्ध रोहित शर्मा’ सामना पाहायला मिळेल. आशा आहे की दुखापतीतून सावरणाऱ्या न्यूझीलंड संघाकडून ट्रेंट बोल्ट नव्या चेंडूने विकेट घेण्यात यशस्वी होईल. त्याचबरोबर न्यूझीलंडचे फलंदाज मधल्या षटकांत कुलदीप यादव, चहल यांच्या गोलंदाजीवर कशाप्रकारे फलंदाजी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल,” असेही हेसन म्हणाले.
रोहित आणि बोल्टची तुलना केल्यानंतर आता हेसनने विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनची (Kane Williamson) तुलना करताना म्हणाले, “विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे. परंतु न्यूझीलंडमध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळणे सोपे नसते. मला हे पाहणे आवडेल की, तो येथे पहिल्या 10-20 चेंडूचा सामना कशाप्रकारे खेळतो.”
“तसेच, दुसरीकडे विलियमसनचे हे घरचे मैदान आहे आणि तो येथे कोणत्याही संघाविरुद्ध सहज चांगली कामगिरी करत आला आहे”
यापूर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा ‘टी२० सामना 2014 मध्ये खेळला होता.
…म्हणून १९ वर्षांखालील टीम इंडियाचा 'हा' फोटो होतोय जोरदार व्हायरल
वाचा👉https://t.co/c7VBxWnPwk👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
न्यूझीलंडविरुद्ध तो नाद विराट कोहली पुर्ण करणारच…
https://t.co/mKjdfegpkC#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020