---Advertisement---

धरमशाला कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल; एकाचे पदार्पण, तर एकाचे पुनरागमन

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशालेत सुरू झाला. पाहुण्या इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्वाचे बदल पाहायला मिळाले. 

भारतासाठी देवदत्त पडिक्कल या सामन्यात कसोटी पदार्पण केले. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पडिक्कल भारताचा पाचवा पदार्पणवीर आहे. मालिकेतील सुरुवातच्या सामन्यांमध्ये सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप, आणि रजत पाटीदार यांना भारतासाठी कसोटी पदार्पण केले.

दुसरीकडे भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही संघात पुनरागमन झाले आहे. बुमराहला मालिकेतील चौथ्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. पाचव्या सामन्यात त्याने पुनरागमन केल्यानंतर आकाश दीप याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ – 
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर
मुंबई शहर ने विजयाचा खात उघडला, तर जालना संघाचा सलग दुसरा पराभव 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---