पोचेफस्टरूम| आज(9 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ 5 व्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या तर बांगलादेश पहिलाच विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.
पण आजच्या सामन्यात जर पावसामुळे व्यत्यय आला तर आयसीसीच्या नियमानुसार सामन्याच्या निर्धारित दिवशी पंच सामना अतिरिक्त वेळेत खेळवू शकतात. तसेच षटकांची संख्या कमी करु शकतात. पण सामना 20-20 षटकांचा होणे अनिवार्य असेल.
मात्र जर निर्धारित दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर तो सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. तसेच सामन्याच्या निर्धारित दिवशी ज्या स्थितीत सामना असेल त्याच स्थितीतून पुढे राखीव दिवशी सामना सुरु होईल.
जर सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात कोणत्याही कारणाने अडथळा आला किंवा कोणत्याही कारणाने सामना रद्द झाला तर अशावेळी दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
आज सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा आहे प्रियम गर्गच्या टीम इंडियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या फायनलपर्यंतचा प्रवास…
https://t.co/z36hZAcHj4#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
असा आहे टीम इंडिया आण १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा इतिहास
वाचा👉https://t.co/1UFSxJmOtZ👈#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020